Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News : वीजेच्या धक्क्याने शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू, नातेवाईकांसह कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी

Jalgaon News: जळगावच्या पिंप्राळा परिसरात विजेच्या धक्क्याने शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख योगेश उर्फ भैय्या वाघ यांचा मृत्यू झाला. पाळधी-तरसोद बायपासवर आयशरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 28, 2026 | 05:06 PM
Jalgaon News : वीजेच्या धक्क्याने शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू, नातेवाईकांसह कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी

Jalgaon News : वीजेच्या धक्क्याने शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू, नातेवाईकांसह कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी

Follow Us
Follow Us:
  • पिंप्राळ्यात इलेक्ट्रिकचे काम करताना वाघ यांचा मृत्यू
  • पाळधी बायपासवर अपघातात तरुणाचा मृत्यू
  • जुलैपासून बायपासवरील २५ अपघातांत १३ जणांचा मृत्यू 
 

Jalgaon News : शहरातील पिंप्राळा परिसरात घरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना विजेचा जोरदार धक्का लागून खासगी वायरमन योगेश उर्फ भैय्या वाघ यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर त्यांना जळगाव (Jalgaon) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
योगेश वाघ हे शिवसेना ठाकरे गटाचे पिंप्राळा भागाचे विभागप्रमुख असल्याने त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांसह शिवसैनिकांनी रुग्णालयात गर्दी केली.

शिवसैनिकांना मोठा धक्का

सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेलेल्या भैय्या वाघ यांच्या मृत्यूची बातमी दुपारी समजल्याने कुटुंबीयांसह स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी महानगर अध्यक्ष गजानन मालपुरे यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.
विशेष म्हणजे, मंगळवारीच भुसावळ येथेही शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. घरात एकीकडे मुलीच्या साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे आई-वडिलांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर, बुधवारी शिवसेना विभागप्रमुख योगेश वाघ यांचाही वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बाळापूर तालुक्यात पाणीप्रश्न बिकट; तलावांनी गाठला तळ, नळाला पाणी येत नसल्याने…

पाळधी बायपासवर अपघातांची मालिका, एकाचा मृत्यू

जळगाव शहरालगतच्या पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांची मालिका सुरूच आहे. येथे आणखी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. पाळधी रेल्वे पुलावर आयशर मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने योगेश गजमल राक्षे यांचा मृत्यू झाला. बायपास धसल्यानंतर या मार्गावरील अपघातांत मृत्यू झालेल्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे.
योगेश हे आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम करीत होते. दुचाकीने घरी जात असताना पाळधी रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या योगेश यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, 30 जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव धसल्यानंतर बायपासवरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

त्यामुळे अवजड वाहतूक शहरातून वळवण्यात आली. जुलैपासून आतापर्यंत 25 अपघातांत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. योगेश यांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या मृत्यूने राक्षे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी आयशर वाहनचालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले.

राणा सूर्यवंशींना वाय प्लस सुरक्षा का? रोहित पवारांचा सवाल; सखोल चौकशीची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: जळगावमध्ये विजेच्या धक्क्याने कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: शिवसेना ठाकरे गटाचे पिंप्राळा विभागप्रमुख योगेश उर्फ भैय्या वाघ यांचा मृत्यू झाला.

  • Que: योगेश वाघ यांना विजेचा धक्का कसा लागला?

    Ans: घरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला.

  • Que: पाळधी-तरसोद बायपासवर झालेल्या अपघातात कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: आयशर मालवाहू वाहनाच्या धडकेत योगेश गजमल राक्षे यांचा मृत्यू झाला.

Web Title: Jalgaon news shiv sena vibhag pramukh electric shock youth dies bypass accident rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • farmer
  • shivsena
  • Thakarey group

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik on Manoj Jarange : ‘जरांगेंनी स्वतःचा पक्ष काढावा!’ प्रताप सरनाईकांचा खोचक टोला, ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
1

Pratap Sarnaik on Manoj Jarange : ‘जरांगेंनी स्वतःचा पक्ष काढावा!’ प्रताप सरनाईकांचा खोचक टोला, ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं

Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीत वादाची ठिणगी? शिंदे गटाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?
2

Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीत वादाची ठिणगी? शिंदे गटाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?

Amravati News: चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश
3

Amravati News: चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश

Aaditya Thackeray : ‘मरण आलं तरी चालेल, पण लढा थांबणार नाही!’ साय डोंगरातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा
4

Aaditya Thackeray : ‘मरण आलं तरी चालेल, पण लढा थांबणार नाही!’ साय डोंगरातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.