"गोल टोपी घालणारे मतदान करत नाहीत, हिरवा साप...", नितेश राणेंचं मोठं विधान (फोटो सौजन्य-X)
Nitesh Rane News Marathi: भाजप नेते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितीश राणे हे नेहमीच वादग्रस्त विधान करतात. हिंदुत्वाबद्दल बोलताना त्यांनी पुन्हा मुस्लिम समुदायावर निशाणा साधला. ‘गोल टोपी आणि दाढी घालणाऱ्या लोकांनी मला मतदान केले नाही. हिंदूंनी मला मतदान केले. त्यानंतर मी आमदार झालो. यामुळे मी हिंदूंची बाजू घेतली नाही, तर उर्दू लोकांचीही बाजू घेईन का?’, असा प्रश्न नितेश राणे यांनी केला आहे.
तसेच नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ज्यामुळे अल्पसंख्याक समुदायातील लोक नाराज होऊ शकतात. यावेळी नितेश राणे म्हणाले की, गोल टोपी घालणारे लोक त्यांना मतदान करत नाहीत. ते हिरवे साप आहेत. त्यांचे स्पष्ट संकेत मुस्लिम समुदायाकडे होते. त्यांनी असेही म्हटले की हिंदू मतदारांमुळे ते निवडणूक जिंकले आहेत आणि मंत्री झाले आहेत.
Mumbai, Maharashtra Minister Nitesh Rane says, “The ones wearing round caps and beards did not vote for me. I have become an MLA with the votes of Hindus. If I do not support Hindus, will I support those who speak Urdu?… They are green snakes… The DNA of Mumbai is Hindu.” pic.twitter.com/m9UJMOLeyR — ANI (@ANI) July 11, 2025
नितेश राणे यांनी मुंबईत म्हटले आहे की, “गोल टोप्या आणि दाढी असलेल्या लोकांनी मला मतदान केले नाही. मी हिंदूंच्या मतांनी आमदार झालो. जर मी हिंदूंना पाठिंबा देणार नाही, तर मी उर्दू भाषिकांना पाठिंबा देईन का? ते हिरवे साप आहेत… मुंबईचा डीएनए हिंदू आहे.” , असं वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केले आहे.
संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव वाढत आहे. त्यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांना टोला लगावला. ते म्हणाले की, ‘कुठली जनता मातोश्रीची आणि कलानगरची. जनता आमच्यासोबत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने १० महिने अगोदर निवडून दिले . आम्हाला पाकिस्तानच्या जनतेने निवडून दिले नाही. कुठली जनता पाटणकर की ठाकरे केवढी जनता आहे त्यांची.’
मीरा रोडमध्ये मराठी लोकांसाठी आंदोलन केले होते . या आंदोलनामध्ये अनेक मुस्लिम बांधवही सहभागी झाले होते आणि त्यांनी मराठी बोलून दाखवली. . यावरुन नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘मुस्लिम बांधव त्यांच्या सभेला येतील तेव्हा आम्ही मराठी बोलू. उद्याची अजान मराठीत सुरू करा. मराठीवर एवढेच प्रेम आहे तर सगळ्या मदर्सातील उर्दू बंद करून तिथे मराठी सक्ती करा. मग आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहात. नुसतं अशा पद्धतीची थुकपट्टी ढोंगीपणा करायचा हे सर्वांना कळत आहे.