Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election 2026 : महायुतीत ठिणगी! ‘महायुतीत मातोश्रीप्रेमी आहेत का?’ नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

MLC Election 2026 : विधानपरिषद निवडणुकीतील निकालानंतर भाजप आणि शिंदे गटातील राजकीय वाद चांगलाच रंगला आहे. रविंद्र धंगेकरांच्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं, तर संजय राऊतांनाही थेट सवाल केले.

  • By विवेक
Updated On: Oct 29, 2026 | 03:30 PM
Nitesh Rane

Nitesh Rane

Follow Us
Follow Us:
  • विधानपरिषद निवडणुकीतील निकालानंतर महायुतीत नाराजी
  • नितेश राणेंचा शिंदे गटावर निशाणा
  • रविंद्र धंगेकरांच्या टीकेला नितेश राणेंचं उत्तर
 

MLC Election 2026 : राज्याच्या राजकारणात विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा धुरळा उडाला आहे. विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. शिवसेना शिंदे गटाला एक जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 2 जागा तर काँग्रेसनेही एका जागेवर विजय मिळवला. या निकालानंतर महायुतीत खडाजंगी सुरु झाल्याचे दिसत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अश्यातच भाजप मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेना शिंदे गटातील नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे.

नितेश राणे यांनी आज (29 ऑकटोबर, गुरुवार) पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विधान परिषद निवडणुकांच्या निकालावर भाष्य केले. “महायुतीत काही उद्धव ठाकरेंचे मातोश्रीप्रेमी तर राहिले नाहीत ना?” असं खोचक विधान करत शंका उपस्थित केली. यावरून आता महायुतीत पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

विधानपरिषद निकालानंतर महायुतीत नाराजी?

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नसल्याची चर्चा सुरू आहे. पाच जागांपैकी भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळाला. या निकालानंतर भाजपच्या पराभवावरून राजकीय आरोप सुरू झाले. शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी भाजपच्या उमेदवारावर टीका केली. त्याला उत्तर देताना नितेश राणेंनी महायुतीतील काही नेत्यांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले.

Supreme Court on Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

‘महायुतीत शकुनीमामा आहेत का?’

पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले की, “शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते एकत्र बसून या घटनांवर चर्चा करतील. जिथे आवश्यक असेल तिथे योग्य ती पावलं उचलली जातील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी महायुतीत राहून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने काम करणारे काही लोक आहेत का, अशी शंका व्यक्त केली. ‘शकुनीमामा’ असा उल्लेख करत काही जण मुद्दाम काड्या लावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

संजय राऊतांनाही नितेश राणेंचा टोला

नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. दुसऱ्यांच्या पक्षातील घडामोडींवर भाष्य करण्यापेक्षा आधी स्वतःच्या पक्षाच्या तीन उमेदवारांना किती मतदान मिळालं, याबद्दल बोलावं, असं आव्हान त्यांनी दिलं.

काँग्रेसच्या कामगिरीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. एका अपक्ष उमेदवाराच्या विजयावर जल्लोष करण्याची वेळ काँग्रेसवर आली असल्याचा टोला त्यांनी लगावला.

निवडणुकीच्या निकालानंतर मित्रपक्षांमध्ये सुरू झालेली ही शाब्दिक चकमक आगामी काळात कोणतं वळण घेते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. वरिष्ठ नेते एकत्र बसून हा वाद मिटवतात की आरोप-प्रत्यारोप आणखी वाढतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Nagpur Graduate Constituency Election 2026: संघ अन् मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या पराभवाची काय आहेत कारणे?

💡

Frequently Asked Questions

  • Que: विधानपरिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

    Ans: पाच जागांपैकी भाजपला एक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला दोन, काँग्रेसला एक आणि शिवसेनेला एक जागा मिळाली.

  • Que: नितेश राणे यांनी शिंदे गटावर काय टीका केली?

    Ans: रविंद्र धंगेकरांच्या टीकेला उत्तर देताना राणेंनी महायुतीत राहून उद्धव ठाकरे यांना मदत करणारे काही लोक आहेत का, अशी शंका उपस्थित केली.

  • Que: नितेश राणे यांनी संजय राऊतांना काय सुनावलं?

    Ans: संजय राऊतांनी भाजपच्या अंतर्गत बाबींवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या तीन उमेदवारांना किती मतदान मिळालं, यावर बोलावं, असा टोला राणेंनी लगावला.

Web Title: Mlc election 2026 bjp nitesh rane slams shinde shiv sena sanjay raut vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • BJP
  • MLC Election
  • MLC Election Result 2026
  • Nitesh Rane
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Nagpur MLC Election 2026: हा पराभव लपवता येणार नाही…: नागपूर निकालावरून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले
1

Nagpur MLC Election 2026: हा पराभव लपवता येणार नाही…: नागपूर निकालावरून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का; फक्त दोन जागांवर विजय तर नागपूरची जागा काँग्रेसने जिंकली
2

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का; फक्त दोन जागांवर विजय तर नागपूरची जागा काँग्रेसने जिंकली

Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? CJI सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश
3

Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? CJI सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

Jalgaon News : वीजेच्या धक्क्याने शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू, नातेवाईकांसह कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
4

Jalgaon News : वीजेच्या धक्क्याने शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू, नातेवाईकांसह कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.