Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकमध्ये उभारणार ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Nashik National AI and Data Science Education Centre: भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा संगम घडवण्यासाठी नाशिकमध्ये केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा परिसर विकसित करण्यात येणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 07, 2026 | 09:37 PM
नाशिकमध्ये उभारणार ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
Follow Us
Follow Us:
  • नाशिकमध्ये उभारणार ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम
  • मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
  • नाशिक बनेल शिक्षणाचे नवे केंद्र
भारतीय ज्ञानपरंपरेला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देत नाशिकला देशातील अग्रगण्य शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या नाशिक परिसरामुळे संस्कृत, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला नवी दिशा मिळणार असून, हा प्रकल्प राज्याच्या शैक्षणिक विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Solapur News : नालेसफाई घोटाळ्याला नवा ट्विस्ट ८० लाखांच्या अतिरिक्त बिलांवरून महापालिका प्रशासन घेरले; सभागृहातील खुलासा आणि कागद

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, दिल्लीच्या प्रस्तावित नाशिक परिसरासाठी आरक्षित करण्यात आलेल्या १६.८० हेक्टर (सुमारे ४१.५१ एकर) जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला. यावेळी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. आर. जी. मुरलीकृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश इंदापवार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा आणि आधुनिक संशोधन यांचा समन्वय साधणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आज देशाला गरज आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा नाशिक परिसर हा याच संकल्पनेचे मूर्त रूप ठरेल. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना संस्कृतसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासाची संधी उपलब्ध होईल, तसेच संशोधन आणि नवोपक्रमाला चालना मिळेल.

ते म्हणाले की, नाशिकला धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून देशभरात वेगळी ओळख आहे. आता या प्रकल्पामुळे नाशिक शहराची ओळख उच्च शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय केंद्र म्हणूनही निर्माण होणार आहे. राज्य शासन या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व सहकार्य देत असून, विद्यापीठाच्या उभारणीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. नाशिक जिल्ह्यातील शिलापूर गावात प्रस्तावित नाशिक रिंगरोडलगत ही जमीन असून, ७/१२ उतारा हस्तांतरित झाल्यामुळे संबंधित जमिनीचे अभिलेख विद्यापीठाच्या नावे वर्ग झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने नाशिक येथे अत्याधुनिक, बहुविद्याशाखीय शैक्षणिक परिसर उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४०० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला असून, तो केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. प्रस्तावित परिसरात संस्कृत माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स विषयातील बी.टेक. अभ्यासक्रमासह विविध आधुनिक व पारंपरिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. संस्कृत माध्यमातील या अभिनव अभ्यासक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विशेष कौतुक केले आहे.

या परिसरात विविध अभ्यासक्रमांसाठी सुमारे १,५०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता विकसित करण्यात येणार असून, भारतीय ज्ञानपरंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे हे केंद्र देशातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती संवर्धनाचा मार्ग मोकळा! उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; रिट याचिका फेटाळली

Web Title: Nashik national education centre central sanskrit university ai data science project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Education Department
  • Nashik

संबंधित बातम्या

Tribal Department Scam: आदिवासी विकास विभागातील घोटाळा कुणाच्या आशीर्वादाने?
1

Tribal Department Scam: आदिवासी विकास विभागातील घोटाळा कुणाच्या आशीर्वादाने?

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
2

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
3

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
4

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.