विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य पोलिस दलात होणार मोठे फेरबदल; 65 अधिकाऱ्यांना पदोन्नती
बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. याचा संपूर्ण देशात निषेध केला जात आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी सरकारने ठोस पावलं उचलावीत अशी मागणी केली जात आहे. यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे आणि आंदोलन केली जात आहेत. नाशिकमध्ये देखील बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी हिंदू संघटनांतर्फे बंद पुकारण्यात आला होता. मात्र या काळात दोन गटांत वाद झाला.
हेदेखील वाचा – कोकण रेल्वेच्या प्रश्नावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयसमोर सुरु असलेलं प्रवासी संघटनांचे लाक्षणिक उपोषण मागे
हा वाद वाढत जात दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत अनेक जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत 6 पोलीस देखील जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर आता पोलीस अॅक्शन मोडवर आले असून नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू संघटनांनी नाशिकमध्ये मोर्चा पुकरला होता. सकल हिंदू समाजाच्या सदस्यांनी दुपारी मोर्चा काढला आणि यावेळी भद्रकाली परिसरातील दुकाने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. मात्र बंदच्या निषेधार्थ दुकाने उघडी ठेवण्यात आली होती. त्यानंतर दोन गटात वादावादी आणि नंतर हाणामारी सुरू झाली. यावेळी जोरदार दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला आणि हल्लेखोरांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचाही वापर केला. या घटनेत 6 पोलीस जखमी झाले आहेत. मात्र, आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेबाबत नाशिक पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले असून फोटो आणि व्हिडिओच्या आधारे त्यांची ओळख पटली आहे.
हेदेखील वाचा – राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने जारी केला अलर्ट
याबाबत डीसीपी रवींद्र कुमार चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील घटनेनंतर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. फोटो आणि व्हिडिओच्या आधारे त्यांची ओळख पटली आहे. त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. आता नाशिकमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. लोक आपापल्या कामात व्यस्त आहेत. आरोपींवर जीवित आणि मालमत्तेची हानी करण्याशी संबंधित गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. ही घटना घडलेल्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये सकल हिंदू समाजातर्फे बंद पुकारण्यात आला असून, यादरम्यान भद्रकाली परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. सध्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
जळगावमध्ये समस्त हिंदू समाजाने मोर्चा काढत शोरूमवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. काही अज्ञातांनी दुचाकी शोरूमवर दगडफेक केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेबाबत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.