Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक-पुणे रेल्वे जुन्या प्रस्तावित मार्गानेच हवी, पालकमंत्री विखे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक-पुणे रेल्वे मार्गावरून सध्या राजकारण तापले आहे. यावरून आता अहिल्यानगरचे पालकमंत्री विखे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांना महत्वाचे साकडे घातले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 24, 2025 | 08:18 PM
नाशिक-पुणे रेल्वे जुन्या प्रस्तावित मार्गानेच हवी, पालकमंत्री विखे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक-पुणे रेल्वे जुन्या प्रस्तावित मार्गानेच हवी, पालकमंत्री विखे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Follow Us
Close
Follow Us:
  • नाशिक-पुणे रेल्वे जुन्या प्रस्तावित मार्गानेच हवी
  • अहिल्यानगरचे पालकमंत्री विखे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांना साकडे
  • मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका
पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प जुन्या प्रस्तावित मार्गानेच कार्यान्वित करावा, ही लोकप्रतिनिधी आणि जनतेची भावना राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच २०१९ साली संगमनेर–अकोले मार्गे तयार करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालावरच कार्यवाही करण्याचा आग्रहही त्यांनी धरला आहे.

पालकमंत्री विखे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन रेल्वे मार्गाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. या संदर्भातील वस्तुस्थिती त्यांनी पत्राद्वारेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. केंद्रीय रेल्वे विभागाने पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव २०१९ साली नारायणगाव, संगमनेर, अकोले, सिन्नर या मार्गाने तयार केला होता आणि त्यानुसार काही ठिकाणी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती.

Ratnagiri News : ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन’ महोत्सव; डेअरीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाचे आयोजन

मात्र, नंतर या प्रस्तावात बदल करून मार्ग बदलण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रकल्पात बदल करताना कोणत्याही प्रकारे लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नाही, याकडेही मंत्री विखे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. सध्या प्रकल्प अहवालातील बदलांमुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, प्रशासकीय स्तरावर नेमकी कोणती कार्यवाही सुरू आहे याचीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही, असे त्यांनी नमूद केले.

सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याची मागणी

पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे मार्गात नारायणगाव येथील जेएमआरटी (JMRD) रेडिओ टेलिस्कोप सेंटर अडथळा ठरत असल्याचे कारण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत मांडले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, प्रकल्पाच्या मार्गाबाबत स्पष्टता यावी यासाठी सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी आणि त्यांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी मागणीही मंत्री विखे यांनी केली आहे. २०१९ मधील मूळ प्रकल्प अहवालाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

देवठाण मार्गावरच रेल्वे – विखे यांची ग्वाही

“चिंता करू नका, नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे देवठाण मार्गेच नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी शब्द देतो. मात्र २०१९ साली तयार केलेल्या प्रस्तावात महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदल कोणी केला, हेही जनतेला कळू द्या,” अशा शब्दांत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.

Thane Metro : ठाण्याच्या आतील भागातून धावणार ‘ही’ मेट्रो! रेल्वे आणि मेट्रो स्थानकाला जोडणी, कधी सुरु होणार जाणून घ्या

देवठाण जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन, प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण, जिल्हा परिषद शाळांच्या खोल्यांचे उद्घाटन तसेच विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्डचे वितरण मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर प्रथमच स्पष्ट भूमिका मांडत, रेल्वे पळविल्याचा आरोप करणाऱ्यांना खडे बोल सुनावले.

“स्वतःची अकार्यक्षमता लपविण्यासाठी काही जण रेल्वेच्या प्रश्नावरून शिट्या वाजवत आहेत. मात्र यांचा भोंगा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. पाणी आणि रेल्वे संदर्भातील आरोपांवर बोलताना त्यांनी, “पाणी पळवायला आम्ही खूप लांब आहोत,” असे स्पष्ट केले.

 

Web Title: Nashik pune railway should be on the old proposed route radhakrushna vikhe patil tells devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 08:18 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • radhakrushna vikhe patil

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात जामखेडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
1

Ahilyanagar News: आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात जामखेडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी
2

Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

रायगड मिलिटरी स्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२५–२६ यशस्वीरित्या संपन्न
3

रायगड मिलिटरी स्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२५–२६ यशस्वीरित्या संपन्न

Supreme Court judgment : मृत्युपत्रावर आधारित नामांतरण अर्ज सुरुवातीलाच फेटाळता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4

Supreme Court judgment : मृत्युपत्रावर आधारित नामांतरण अर्ज सुरुवातीलाच फेटाळता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.