Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर Ashok Kharat यांचे आर्थिक धागेदोरे उघड; सिन्नरमध्ये कुटुंबीयांकडे ४५ एकर जमीन

लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर अशोक खरात याचे आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू झाली असून, सिन्नर तालुक्यात त्यांच्या कुटुंबीयांकडे सुमारे ४५ एकर जमीन असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 09, 2026 | 12:21 PM
धक्कादायक! लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर Ashok Kharat यांचे आर्थिक धागेदोरे उघड; सिन्नरमध्ये कुटुंबीयांकडे ४५ एकर जमीन

धक्कादायक! लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर Ashok Kharat यांचे आर्थिक धागेदोरे उघड; सिन्नरमध्ये कुटुंबीयांकडे ४५ एकर जमीन

Follow Us
Follow Us:
  • लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर Ashok Kharat यांचे आर्थिक धागेदोरे उघड
  • सिन्नरमध्ये कुटुंबीयांकडे ४५ एकर जमीन
  • भोंदूगिरीच्या साम्राज्याचे नवे धक्कादायक पैलू समोर
सिन्नर : महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या भोंदू ‘कॅप्टन’ उर्फ अशोककुमार खरात याच्या कथित भोंदूगिरीच्या साम्राज्याचे नवे धक्कादायक पैलू समोर येऊ लागले आहेत. सिन्नर शहरासह पाथरे आणि ईशान्येश्वर देवस्थान असलेल्या मिरगाव परिसरात खरात कुटुंबाच्या नावे कोट्यवधींची जमीन आणि स्थावर मालमत्ता असल्याचे महसुली कागदपत्रांतून उघड झाले आहे.

खरात कुटुंबीयांच्या सिन्नर शहरात मोक्याच्या जागा खरेदी केल्या आहेत. खरात कुटुंबीयांच्या नावे एकट्या सिन्नर शहरात २५८ आर बिनशेती प्लॉट, ९.५ एकर शेती आणि पाथरे मिरगाव शिवारात ३६ एकर शेती आहे. शहरातील बाजार भावानुसार किमान २५ कोटींचे प्लॉट, किमान ५-६ कोटींची जमीन आणि पाथरे, मिरगाव शिवारातील जमिनीचे मूल्य ही ७-८ कोटींच्या घरात आहे. लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आता त्याच्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरेही पुढे येऊ लागल्याने बेनामी संपत्तीचा संशय अधिक गडद झाला असून या व्यवहारांची चौकशी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी, ताबा …

सिन्नरला खरात याच्या नावे गट नंबर २४७/३/२ मध्ये ८० गुंठे बिनशेती प्लॉट आहे. पत्नी कल्पना अशोककुमार खरात यांच्या नावे गट नंबर २४७/३/१/२ मध्ये २८.५५ आर बिनशेती प्लॉट असल्याची नोंद आहे. तसेच गट नंबर २५३/१३ मधील प्लॉट क्रमांक १ मध्ये १६.६८ आर, तर गट नंबर २५८/३/२५९/२/२६०/१ मध्ये एकूण ६५ आर बिनशेती प्लॉट असल्याचे महसुली कागदपत्रांत नमूद आहे. याशिवाय सिन्नर शहरातच गट नंबर ८०६ मध्ये कल्पना खरात यांच्या नावे १२ गुंठे, तर गट नंबर ९३५/१/१ मध्ये ४० आर शेती असल्याचेही महसुली नोंदीत दिसून येते.

पाच जणांचे दोन हेक्टर सामायिक क्षेत्र

कल्पना खरात याच्यासह आणखी चार भागीदारांच्या नावे गट नंबर १६३/४ मध्ये मिळून सुमारे दोन हेक्टर सामायिक शेती असल्याची नोंद आहे. त्यामुळे या व्यवहारातील सहहिस्सेदारही चौकशीच्या कक्षेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बहुतेक बिनशेती प्लॉट हे मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून खरेदी केल्याचे दिसत आहे. हे व्यवहार नियमित मार्गाने झाले की दबाव, धाकदपटशाही किवा भोंदूगिरीच्या प्रभावातून जमीन हस्तगत करण्यात आली, याचा तपास पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे. कॅप्टन खरातने त्यांच्या आईच्या नावे ६८ गुंठे बिनशेती प्लॉट घेतल्याची नोंद आहे. याशिवाय सख्ख्या भावाच्या नावे ६४ गुठे, तर सावत्र भावाच्या नावे ६१ गुंठे शेती असल्याचे महसुली कागदपत्रांतून समोर आले आहे. स्वतःच्या नावेही ८० गुंठे विनशेती जमीन असल्याचे ७/१२ उताऱ्यांवरून स्पष्ट होते.

मिरगावातही मोठे साम्राज्य; शिवनिकाला १५ गुंठे

मिरगाव येथे गट नंबर ३०९ मध्ये पत्नी कल्पना खरात यांच्या नावे ७५ आर, तर स्वतःच्या नावे ७४ आर जमीन आहे. गट नंबर ३१८/१ मध्ये स्वतःच्या नावे १ हेक्टर ३२ आर जमीन असून गट नंबर ३३० मध्ये स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे प्रत्येकी १ हेक्टर ३७ आर जमीन असल्याचे महसुली नोंदीत दिसते. याशिवाय गट नंबर ४४७ मध्ये स्वतःच्या नावे १ हेक्टर ३२ आर जमीन आहे. पत्नीच्या नावे गट नंबर ३१५ मध्ये ०.९७आर, ३१८/४ मध्ये १ हेक्टर ३२ आर, तर ३१८/५ मध्ये १ हेक्टर १३ आर शेती असल्याचेही आढळते. तर आईच्या नावे मिरगावातील दोन गटांमध्ये अनुक्रमे १ हेक्टर ८० आर आणि ०.७२ आर शेती असल्याची नोंद आहे. मिरगाव येथील गट नंबर ३१८/५ मध्ये ईशान्येश्वर मंदिर उभारलेल्या शिवनीका संस्थानच्या नावे अवघे १५ गुंठे क्षेत्र असल्याचे महसुली नोंदीत नमूद आहे. मात्र या संस्थानचा मालकही अशोककुमार खरात असल्याचे समोर आले आहे. मंदिरासह संस्थानचा प्रत्यक्ष जागेवरील पसारा पाहता जामनदीच्या पात्रात अतिक्रमण झाल्याची बाबही पुढे येत आहे. या देवस्थानासमोर जिल्हा परिषद निधीतून पाण्याचा जलकुंभ उभारण्यात आला असून त्यासाठी दोन गुंठे जागा ग्रामपंचायतीच्या नावे करण्यात आल्याचे सातबारा उताऱ्यावरून दिसून येते.

Ashok Kharat case: दुनिया झुकती है…’; अशोक खरातचा कोठडीत ‘मेंटल गेम’!

Web Title: Ashok kharat financial links sinner 45 acre land case news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • crime
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
1

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
2

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
4

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.