Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Traffic Management : त्र्यंबकरोडवर वाहतूक मार्गात बदल, कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी; पोलीस प्रशासनाचा निर्णय

नाशिकमधील त्र्यंबकरोडवर मागील काही दिवसांपासून येथे सातत्याने कोंडी होत असून, भाविक, स्थानिक नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी यामार्गावर पायाभूत सुविधा उभारणीची कामे करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 14, 2026 | 01:24 PM
त्र्यंबकरोडवर वाहतूक मार्गात बदल, कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी; पोलीस प्रशासनाचा निर्णय

त्र्यंबकरोडवर वाहतूक मार्गात बदल, कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी; पोलीस प्रशासनाचा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • सातपूर ते त्र्यंबकेश्वर या मुख्य मार्गावर रस्त्याचे काँक्रिटीकरण
  • त्र्यंबकरोडवर वाहतूक मार्गात बदल
  • कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी
नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलrस दलाने नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतूक मार्गात काही बदल केले आहेत. विशेषतः जड वाहनांना थेट बंदी घालण्यात आली आहे. तर नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या सर्वच वाहनांना गोवर्धनमार्गे वळवण्यात आले आहे. सातपूर ते त्र्यंबकेश्वर या मुख्य मार्गावर रस्त्याचे काँक्रिटीकरण, ड्रेनेज व अन्य पायाभूत सुविधा उभारणीची कामे सुरू असल्याने वाहतूक एकेरी करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. मागील काही दिवसांपासून येथे सातत्याने कोंडी होत असून, भाविक, स्थानिक नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Nashik News: पतंगावरही ‘जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, १२० ते १ हजार रुपयापर्यंत किंमत; गुजरातचे आकर्षक पतंग विक्रीस दाखल

१३ ते १६ जानेवारी रोजी यात्रोत्सव असून जिल्ह्यासह इतर जिल्ह्यासह राज्यातून वारकरी, भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला अवघे एक ते दीड वर्ष बाकी असून, या वेळेपूर्वीच रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

असा असेल एकेरी मार्ग

नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने गोवर्धन-गिरणारे-धोंडेगाव-देवरगाव-वाघेरे फाटा-अंबोली फाटा-सापगाववरुन त्र्यंबकेश्वर अशी वळविण्यात आली आहे. त्यामुळे सातपूर-त्र्यंबकेश्वर या सध्या काम सुरू असलेल्या रस्त्यावरचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. तर त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणारी वाहतूक पूर्वीच्याच एकेरी मार्गाने ठेवण्यात आली आहे.

यामुळे एकेरी वाहतुकीची गरज

सातपूर ते त्र्यंबकेश्वर मार्गावर सुरू असलेल्या रस्ता व इतर बांधकामांमुळे काही ठिकाणी केवळ एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे छोट्या अपघातामुळेही मोठ्या कोंडीची परिस्थिती निर्माण होते. यात्राकाळात ही समस्या अधिक तीव्र होऊ नये, यासाठीच हे तात्पुरते पर्यायी मार्ग लागू करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाने वाहनचालक व भाविकांना जाहीर केलेल्या मार्गाचे पालन करण्याचे आवाहन केले असून, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, आगामी काळात सलग सुट्टांचा मोसम असून, या काळात त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यावेळी सुद्धा वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता एकेरी वाहतुकीबरोबरच पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी होत आहे.

Nashik News : निळवंडीत आढळले चार बछडे; दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

 

Web Title: Changes in traffic flow on tryambakaroad heavy vehicles banned to avoid congestion decision by the police administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Nashik
  • Traffic
  • Travel

संबंधित बातम्या

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
1

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत
2

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत

Nashik Crime: PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; प्रेमप्रकरणाचा संशय
3

Nashik Crime: PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; प्रेमप्रकरणाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.