Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा; मार्च, एप्रिल महिन्यात ५७ हजार हेक्टरवरील पिके झाली उद्ध्वस्त

मार्च-एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसानभरपाईसाठी शासनाकडे मागणी करण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 08, 2026 | 05:37 PM
विर्दभात ५९.९५ मिमी पावसाची तूट

विर्दभात ५९.९५ मिमी पावसाची तूट

Follow Us
Follow Us:
  • ५७८ चावे अवकाळीने झाली बाधित
  • शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा
  • मार्च, एप्रिल महिन्यात ५७ हजार हेक्टरवरील पिके झाली उद्ध्वस्त
नाशिक जिल्हयात मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने ५७ हजार ४६ हेक्टरवरील पिके उद्ध्दवस्त झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे संथगतीने सुरु असून पंचनामे तातडीने पूर्ण करून राज्य शासनाने त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मार्च व एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील विविध भागांना अवकाळी व गारपिटीचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे हाताशी आलेली कांदा, गहू, द्राक्ष, भाजीपाला व अन्य फळबागा मातीमोल झाल्या आहेत. तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून शासनाने त्वरित पंचनामे पूर्ण करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. मालेगाव, सटाणा, देवळा, नाशिक, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेषतः सटाणा तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा कहर पाहायला मिळाला असून मोठे नुकसान झाले आहे.

Nashik News : फोर्टिफाईड राईसबाबत गैरसमज दूर करा; प्लास्टिक तांदूळ नसून पोषक धान्य, सिन्नर तहसीलदारांचे आवाहन

मार्च व एप्रिल ७ महिन्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहे. दोन्हीही महिन्यातील नुकसानीचे पंचनामे एकत्रितरित्या सुरु करण्यात येत असून पुढील तीन दिवसात पंचनामे पूर्ण होतील, अशी प्रतिक्रिया जिल्हा कृषी अधिक्षक रवींद्र माने यांनी दिली.

शेतमालाला भाव नाही. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तरी भरून निघेल,अशी प्रतिक्रिया जय किसान फार्मर्स फोरम विभागीय अध्यक्ष निवृत्ती न्याहरकर यांनी दिली.

मार्च, एप्रिलमध्ये ८७ गारपीट झाला पीक काढणीच्या हंगामात अवकाळीने नुकसान झाले. शासनाने कर्जमाफीच्या धोरणांमध्ये गारपीट व अवकाळीग्रस्त शेतक-यांसाठी विशेष पॅकेजची व्यवस्था करणे आवश्यक आहे, अशी माहिती सरचिटणीस, जिल्हा काँग्रेस कमिटी सचिन होळकर यांनी दिली.

पिकनिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)

कांदा – ४४,७०१
डाळिंब – ४,८४७.५०
गहू – ३,२८०.३५
भाजीपाला – १,१८६.३५
द्राक्ष -९०२
मका – ८६९
कांदा रोप -५३.५०
टोमॅटो -३५.४०
पेरू -०.५२
आंबा – 0.५५

St Bus: एसटीचे अकार्यकारी अधिकारी मोकाट, प्रशासनाने नेमलेली चौकशी समिती अर्धवट, श्रीरंग बरगे यांचा आरोप

Web Title: Farmers await financial aid 57 thousand hectares crops damaged march april maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
1

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे
2

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे

Torrent Hydraulic Power Project: टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द
3

Torrent Hydraulic Power Project: टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द

Bhimashankar Temple: श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई
4

Bhimashankar Temple: श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.