
यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ (फोटो सौजन्य-ChatGPT)
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला २१ दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या दुर्वांचे धार्मिक महत्त्व
यंदा थ्रीडी फोल्डेबल मखर, मखमली मखर, कागदी व पुठ्ठयाचे रेडीमेड मंदिर, विविध धार्मिक व ऐतिहासिक थीमचे बॅकड्रॉप, गोवर्धन पर्वत, राम मंदिर तसेच शिवकालीन गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींना मागणी आहे. कमी जागेत सहज बसणारे आणि वापरल्यानंतर साठवून ठेवता येणारे फोल्डेबल मखर ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.
सजावटीमध्ये एलईडी चक्र, लायटिंग तोरण, मल्टीकलर लाइट्स, लेझर लाइट्स, फेरी लाइट्स आणि डिजिटल लाइटिंग बैकड्रॉप यंदाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. पारंपरिक सजावटीसोबत कृत्रिम झेंडूच्या माळा, मोगऱ्याच्या कळ्यांचे लटकन, विविध रंगांच्या कापडी व प्लास्टिकच्या वेली यांनाही मागणी वाढली आहे.
गणेशभक्तांकडून कमी खर्चात आकर्षक आरास करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे तयार सजावटीचे किट, कागदी मखर, कापडी बेंकड्रॉप आणि रेडीमेड मंदिराच्या डिझाइनला चांगली मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सागितले. “थर्माकोलच्या वापरावर निर्बंध आल्यापासून ग्राहकांचा कल कापडी बॅकड्रॉप, मखमली मखर आणि कागदी रेडीमेड मंदिरांकडे वाढला आहे. कमी बजेटमध्ये आकर्षक सजावट करता येत असल्याने रेडी-टू-यूज साहित्याला यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती जुने नाशिकमधील सजावट साहित्य विक्रेत्यांनी दिली.
एलईडी सिरीज लाइटिंग – १०० ते ५००
प्लास्टिक फुलांच्या माळा – ५० ते ३००
डेकोरेटिव्ह बल्ब – ३० ते १५०
पडदा एलईडी लाईट – ३०० ते १,०००
एलईडी माळ – ५० ते २००
एलईडी पट्टी – ५० ते ३००