
'...तर निवडणुकांवर बहिष्कार टाकणार', रस्त्याचा प्रश्न चिघळला; ग्रामस्थांचे उपोषण
येत्या दोन दिवसात ठोस निर्णय न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. रूई येथील जिल्हा परिषद मार्ग क्र. २६६, किमी ११ ते १३ या जुना खेडला रस्त्याचे गत वीस वर्षांपासून काम झालेले नाही. या रस्त्यालगत दाट लोकवस्ती आहे. हा रस्ता दळण वळण, शेतमाल वाहतुक व शालेय विद्यार्थ्यांना जाणे येणे साठी खूप महत्वाचा आहे. सदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था इसली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रुग्णास रुग्णालयात नेण्यासाठी व उपचारासाठी जाणे कामी फार उशीर होतो. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. रस्त्याच्या प्रश्नाचाबत वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, तहसिलदार, आमदार यांना पत्र व्यवहार तसेच लेखी निवेदन देऊनही अनेक वर्षापासून ही मागणी प्रलंबित असून, न्याय मिळत नाही. त्यामुळे बुधवार (दि. १९) पासून रूई धानोरे ग्रामपंचायत कार्यालयासमोर रामदास तासकर यांच्या नेतृत्वाखाली अंकुश तासकर, विलास गायकवाड, बापू रोटे, निलेश रोटे, बापू तासकर, लीलाबाई बोरगुडे, संतोष तासकर, शोभा रोटे, संदीप रोटे, सुनील तासकर, बाळासाहेब गायकवाड, वैभव तासकर, लखन तासकर, महेश झुरळे, योगेश रोटे, बापू गायकवाड, राजू बोरगुडे, पिराजी तासकर, सुनिल शिंदे आदींसह आमरण उपोषण सुरू केले आहे.
यादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही प्रशासनाची राहील, तरी शासनाने येत्या दोन दिवसात निर्णय घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार असून, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
Ans: नाशिक महापालिकेत ३१ प्रभागात एकुण १२२ जागा आहेत.
Ans: नाशिक जिल्हापरिषदेच्या ७४ गटांपैकी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार ५४ गट आरक्षित आहेत. त्यात एसटी २९, एससी ५ व ओबसी २० अशा जागा आहेत.
Ans: राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.