नाशिकमध्ये बिबट्याचा धुमाकूळ (फोटो- सोशल मीडिया)
नाशिकच्या गंगापूर येथे भर वस्तीत घुसला बिबट्या
बिबट्याच्या हललत्यात 3 नागरिक जखमी
वनविभागाचे बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न
राज्यातील अनेक भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर , आंबेगाव, जुन्नर परिसरात तर बिबट्याने कहर केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान आज नाशिक जिल्ह्यातील गंगापुर येथे भर वस्तीत बिबट्या घुसला आहे. त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
नाशिक जिल्ह्यातील गंगापुर येथील भर वस्तीत एक बिबट्या शिरला आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बिबट्याने अनेक नागरिकांवर हल्ला केला असल्याचे समजते आहे. 3 जन बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार केले जात आहेत.
बिबट्याने घेतला 5 वर्षीय चिमूरडीचा बळी
खारेकर्जुने (ता. अहिल्यानगर) येथे बिबट्याने बुधवारी सायंकाळी उशीरा रियंका (वय ५) या चिमुरडीला उचलून नेत जिवे ठार मारले. या घटनेने संतापलेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. १३) गाव, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बिबट्या जेरबंद होत नाही, तो पर्यत मुलीवर अंत्यविधी न करण्याचा निर्णय संतप्त ग्रामस्थांनी घेतला आहे. आक्रमक ग्रामस्थांमुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
खारेकर्जुने येथे बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास शेतात शेकोटी करत असताना तुरीच्या शेतातून बिबट्या आला. त्याने रियांका सुनिल पवार या मुलीला उचलून धूम ठोकली. या घटनेमुळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रभर मुलीचा शोध ग्रामस्थांनी घेतला. गुरुवारी सकाळी येथील शाळेच्या मागील बाजूस हिंगणगाव रस्त्यालगत मुलीचा मुतदेह सापडला. बिबट्याने मुलीच्या हाता-पायाला जखमा केल्याचे दिसून आले. घटनेच्या निषेधार्थ खारेकर्जुने ग्रामस्थांनी बैठक घेतली.
Pune Leopard Attack: तीन जणांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या ठार; शार्प शूटर पथकाने थेट…
बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत गाव बंद ठेवण्यात येईल, मुलीचा अंत्यविधी केला जाणार नाही, शाळा बंद ठेवणार असे निर्णय ग्रामस्थांनी घेतले. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळावी या मागणीचे निवेदन पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यानी तहसीलदार संजय शिंदे यांना दिले.






