Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHADA Nashik: नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात

MHADA Nashik: नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील विविध गृहप्रकल्पांमधील ४१२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या या सोडतीत IHLMS 2.0 प्रणालीचा वापर करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 18, 2026 | 06:54 PM
नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात

नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात

Follow Us
Follow Us:
  • म्हाडाच्या ४१२ घरांसाठी संगणकीय सोडत
  • IHLMS 2.0 प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने निकाल
  • २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांसाठी उत्साह
 

MHADA Nashik: नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील ४१२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. नाशिकमधील गृहनिर्माण भवन कार्यालयात या सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. ते दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या सोडतीत नाशिक शहर परिसरातील पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, मखमलाबाद शिवार, आडगाव शिवार, सातपूर शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, तपोवन लिंक रोड, आगर टाकळी शिवार, गंगापूर शिवार, सिन्नर फाटा, देवळाली शिवार, चेहडी, मेरी-रासबिहारी लिंक रोड आणि वडाळा शिवार येथील विविध गृहप्रकल्पांमधील ४१२ सदनिकांचा समावेश होता.

‘… तर विकासकांना थेट जेलमध्ये टाका’; Mhada ची घरे अडवणाऱ्यांना Mangal Prabhat Lodha यांचा इशारा

सोडत पूर्णपणे पारदर्शक

यावेळी रंजन ठाकरे यांनी म्हाडाची IHLMS 2.0 संगणकीय प्रणाली पारदर्शक, सोपी आणि सुलभ असल्याचे सांगितले. संगणकीय सोडत प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असल्याने त्यामध्ये मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घर न लागलेल्या अर्जदारांनी निराश न होता आगामी म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी व्हावे. भविष्यात म्हाडाच्या माध्यमातून आणखी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

अधिकृत संकेतस्थळावर निकाल

मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी सोडतीचा निकाल म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती दिली. अर्जदारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल तपासावा, असे आवाहन त्यांनी केले. सोडतीच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या यशस्वी अर्जदारांचा शिवकुमार आवळकंठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

घरबसल्या पाहता आले थेट प्रक्षेपण

सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या अधिकृत YouTube चॅनेल @mhadaofficial वर करण्यात आले. त्यामुळे अर्जदारांना सोडतीचा कार्यक्रम घरबसल्या पाहता आला. कार्यक्रमाला मंडळाचे उपमुख्य अधिकारी प्रवीण बागूल, कार्यकारी अभियंता कविता निकम, कार्यकारी अभियंता वैशाली पवार, मिळकत व्यवस्थापक नितिन कुलथे, उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य प्रकाश महाजन, उपजिल्हाधिकारी व विशेष भूसंपादन अधिकारी रविंद्र भारदे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी विक्रम नैन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सोडतीचे सूत्रसंचालन राजेश हिंगमिरे यांनी केले.

Mhada Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडा लॉटरीचे शेड्यूल लवकरच जाहीर;75 हजारांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपणार

Web Title: Mhada nashik 20 percent inclusive housing scheme 412 flats computerized lottery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • mhada
  • MHADA Lottery 2026
  • Nashik

संबंधित बातम्या

Mhada चा मोठा निर्णय! GTB नगरच्या रहिवाशांना मिळणार महिन्याला २० हजार, तर…
1

Mhada चा मोठा निर्णय! GTB नगरच्या रहिवाशांना मिळणार महिन्याला २० हजार, तर…

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम
2

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित
3

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे
4

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.