Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Nashik News: नाशिक महापालिकेच्या महासभेत शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा वातावरण तापले. खड्ड्यांवरून दिनकर पाटील आणि बोरस्ते यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 21, 2026 | 11:59 AM
खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • खड्डयांच्या प्रश्नांवरून मनपा महासभेत पुन्हा जुंपली
  • दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये वाद
  • अधिकाऱ्यांची बदली करा
नाशिक: महपालिकेच्या महासभेत गुरूवारी पुन्हा शहरातील खड्यांवरून जोरदार खडाजंगी होवून शहर अभियंत्यांची बदली करून रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या सभेत खड्धात पडून गेल्या महिन्यात जखमी झालेले नगरसेवक अमोल पाटील हे पायाला प्लास्टर बांधून उपस्थित राहिले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देण्यात अधिकारी असमर्थ ठरले.

यावरून दिनकर पाटील व शिंदे सेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांच्यात जोरदार खडाजंगी होवून व्यक्तीगत आरोप करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. प्रश्नोत्तराच्या तासात नगरसेवक अमोल पाटील यांनी स्वतः खड्ड्यात पडल्याचा उल्लेख करून प्रभाग नऊ मध्ये २८७ खड्डे असून त्याची यादी आपण अधिकाऱ्यांना देवूनही ते बुजविले गेले नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. (Nashik News)

Nashik Earthquake: नाशिक पुन्हा हादरलं! पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

अमोल पाटील यांनी वेधले लक्ष

गेल्या दिड महिन्यांपासून उपचार घेत असलेले अमोल पाटील है महासभेत पायाला प्लास्टर करून दाखल झाले. त्याना स्वतंत्र खुर्ची देण्यात आली. उभे राहता येत नसल्याने त्यांनी बसूनच आपले प्रश्न मांडले. त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले होते. आपले प्रश्न संपल्यानंतर पुन्हा ते सभागृहातून रवाना झाले.

शहर अभियंता अग्रवालांच्या बदलीवरून वाद

दरम्यान, खड्ड्यांच्या प्रश्नावरून बोलतांना दिनकर पाटील यांनी अनेक वेळा शहर अभियंत्यांची बदली करण्याचा विषय येतो, गटनेते अजय बोरस्ते यांनी देखील मागणी केली होती; परंतु पुढे त्यांनी या विषयावर चूप राहणे पसंत केल्याचे म्हटल्याने त्याला गटनेते अजय बोरस्ते यांनी आक्षेप घेतला. बोरस्ते यांनी पलटवार करीत, खड्यांच्या प्रश्नावर विशेष महासभा घेण्याची मागणी शिवसेनेने केली व शहरवासियांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणली हे विसरू नका असा दम भरीत, सभागृहात व्यक्तिगत आरोप होत असतील तर अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, सायंकाळी शहर अभियंत्याच्या दालनात कोण बसलेले असते? जास्त बोलण्यास भाग पाडू नका असा इशारा देत नगरसेवक अमोल पाटील यांच्या अपघाताबद्दल आपल्यालाही दुख झाल्याचे सांगितले. सभागृहात नौटंकी बंद करा, गेल्या सभेत खड्ड्यांवर का बोलले नाहीत अशा शब्दात दिनकर पाटील यांना सुनावले. हा प्रकार घडत असतांना सभागृहात एकदम शांतता पसरली. अखेर महापौरांनी मध्यस्थी करीत पुढील विषय पुकारत वादावर पडदा टाकला.

रस्ता तयार झाल्यानंतर ठेकेदारावर तीन वर्षे जबाबदारी असणार

याच प्रश्नांवर दिनकर पाटील यांनीही पुढे बोलतांना सन २०२२ पासून शहरात किती रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करण्यात आले. अशा रस्त्यांवरच खड्डे पडले काय ? याकामांचे कार्यारंभ आदेश देण्याची मागणी करूनही अधिकाऱ्याकडून उत्तरे देण्यात आली नसल्याचे सांगितले. बांधकाम विभागाने कोणत्या रस्त्यांवरील खड्डे बुजविले? ठेकेदारावर रस्ता केल्यानंतर तीन वर्षे जबाबदारी असतांना त्यांनी ती पार पाडली? खड्डे कोणी बुजविले अशा प्रश्नांची सरबत्ती करीत शहर अभियंता व बांधकाम खात्याने संपुर्ण शहराला वेठीस धरल्याचे सांगितले. शहर अभियंत्यांनी बदली करा व रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची एसआयटी चौकशी करा अशी मागणी केली. आपण मागितलेली माहिती विस्तृत स्वरूपात पुढच्या महासभेत देण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी केली.

MHADA Nashik: नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात

Web Title: Nashik municipal corporation general body meeting potholes dinkar patil boraste clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण
1

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?
2

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?

कचरागाड्यांचा त्रास आटोक्यात आणा! उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश; कांजूर कचराभूमीबाबत सुनावणी
3

कचरागाड्यांचा त्रास आटोक्यात आणा! उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश; कांजूर कचराभूमीबाबत सुनावणी

PNG कनेक्शन घेणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; नव्या जोडणीवर मिळणार २०० SCM अतिरिक्त गॅस
4

PNG कनेक्शन घेणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; नव्या जोडणीवर मिळणार २०० SCM अतिरिक्त गॅस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.