Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: ‘रस्ते की खड्डे?’ सिंहस्थाच्या नावाखाली निधीची उधळपट्टी; नागरिकांचा प्रशासनावर संताप

Nashik News Marathi: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी नाशिक शहरातील रस्ते महिनोनमहिने खोदून ठेवल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघातांचे प्रमाण वाढले असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 30, 2026 | 11:06 AM
'रस्ते की खड्डे?' सिंहस्थाच्या नावाखाली निधीची उधळपट्टी; नागरिकांचा प्रशासनावर संताप

'रस्ते की खड्डे?' सिंहस्थाच्या नावाखाली निधीची उधळपट्टी; नागरिकांचा प्रशासनावर संताप

Follow Us
Follow Us:
  • सिंहस्थाच्या कामांमुळे नाशिककर त्रस्त
  • खोदलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाढवला जीविताचा धोका
  • सिंहस्थाच्या नावाखाली निधीची उधळपट्टी
नीलेश अलई,नाशिक: नाशिकमधील (Nashik News) सिंहस्थाच्या नावाखाली गेल्या चार-सहा महिन्यांपासून शहरातील रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. बहुतांश रस्त्यांवर कामे सुरू असल्याने वाहनचालक, नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहेत. अनेकांना या खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला. मात्र ना प्रशासन ना कुंभमेळा मंत्री कुणालाही याकडे गांभीर्याने पहायला वेळ नाही. रस्त्यांवर खड्डे झालेले आहेत ते बुजवावेत, एवढी सृजनशीलतादेखील या आयुक्त, महापौर अन् मंत्र्यांना नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मात्र नाशिककरांचा संयम सुटून या खोदलेल्या खड्यातूनच ‘झुरळ’ बाहेर येण्याची वाट तर हे पहात नाहीत ना, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

केवळ सरकारी निधीची उधळपट्टी

पावसाळा सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी या खड्यामध्ये जमा झालेले आहे. त्यामुळे वाहनचालकांना हा रस्ता आहे की खड्डा, हे कळत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्खा प्रमाणात अपघात होत आहेत. रस्ते तयार होत नसतील तर किमान अशा खड्चांमध्ये मुरूम, खडी टाकून तरी हे खड्डे बजवावेत, ही माफक अपेक्षा नागरिकांनी आहे, मात्र महापालिका प्रशासन आणि शासन यांना याकडेही बघायला वेळ नाहीं. केवळ निधीची उधळपट्टी करायची म्हणून कामे सुरू करून ठेवली आहेत, आता ही कामे होणार कची? आणि तोपर्यंत किती जणांचा बळी घेणार? हाच खरा प्रश्न आहे.

Nashik News: धक्कादायक! खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन हवेतच, मुदत संपल्यानंतर उच्च न्यायालयाच्या कडक सूचना

रस्ते चांगले देवू शकत नाही ते प्रशासन अन् शासन काय कामाचे

सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. याबाबत महापालिका प्रशासन, आयुक्तांना वारंवार पत्र देण्यात आले. मात्र तांत्रिक कारणे पुढे करून रस्ते दुरूस्तीच्या कामात चालढकल करण्यात येत आहे. किमान मूलभूत प्रश्नांकडे तरी प्रशसानाने गांभीर्याने पहाण्याची गरज आहे. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावरील खड्डे मनपा बुजवू शकत नसेल तर ते प्रशसान अन् शासन काय कामाचे? असा उद्विग्न प्रश्न निमाचे अध्यक्ष आशीष नहार यांनी उपस्थित केला.

अनेक कुटुंब उघड्यावर

खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याने आता नागरिकांचाही संयम सुटू लागला आहे. खड्चात पडून अपघात झाल्याने घरातील कर्त्यांचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडली आहेत. त्यामुळे प्रशासनाने विकासाच्या नावाखाली खोदून ठेवलेल्या खड्डयातूनच ‘झुरळ’ बाहेर येतील अन् तेच प्रशासन आणि मत्र्यांना या खोदलेल्या रस्त्यांचा जाब विचारतील, याची जाणीवही ठेवायला हवी.

महापौरांचे आश्वासन केवळ सत्कारापुरतेच !

सिंहस्थासाठी शहरात सोयीसुविधा व्हाव्यात, यात कुणाचेही दुमत नाही. मात्र या कामांचे नियोजन होणेही गरजेचे आहे. शहरातील बहुतांश परिसरातील रस्ते खड्डयात गेले आहेत. या ठिकाणी साधे फलक लावण्याचे सौजन्यही महापालिका अन् ते ठेकेदार दाखवत नाहीत. त्यामुळे अपघातांत मोठी वाढ होऊन लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. औद्योगिक वसाहतीत असलेल्या रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. या रस्त्यांचे काम लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासन महापौरांनी सत्काराच्यावेळी दिले होते. मात्र या रस्त्यांचे कामही अजून झालेले नाही. किंबहूना त्यानंतर काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही

Web Title: Nashik news roads dug up for simhastha potholes spark public anger accident risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.