Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : आगामी सिंहस्थासाठी मोठी खुशखबर! ओझर विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मंजुरी, नाशिकच्या विकासाला नवे पंख  

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ओझर येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांनी अधिकृत मंजुरी दिली आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: May 21, 2026 | 11:04 AM
आगामी सिंहस्थासाठी मोठी खुशखबर! ओझर विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मंजुरी, नाशिकच्या विकासाला नवे पंख

आगामी सिंहस्थासाठी मोठी खुशखबर! ओझर विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मंजुरी, नाशिकच्या विकासाला नवे पंख

Follow Us
Follow Us:
  • आगामी सिंहस्थासाठी मोठी खुशखबर
  • ओझर विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मंजुरी
  • नाशिकच्या विकासाला नवे पंख
 

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ओझर येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या बांधकामास नवी दिल्ली येथील नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांनी अधिकृत मंजुरी दिली आहे. याबाबतचे मंजुरी पत्र ओझर विमानतळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना प्राप्त झाले असून, या निर्णयामुळे आता विस्तारीकरणाच्या कामाला मोठी गती मिळणार आहे. या मंजुरीमुळे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी हे सर्व काम वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. विमानतळाचे काम वेळेत पूर्ण झाल्यास कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून नाशिकच्या विकासाला नवी उड्डाणे मिळतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

Nashik News : पावसाळ्यापूर्वी मनपाची धावपळ; शहरातील 211 ठिकाणी पाणी साचण्याचा धोका, मनपा अलर्ट मोडवर

नवे अॅप्रॉन : नवीन विमाने उभी करण्यासाठी अद्ययावत अॅप्रॉनचे बांधकाम.

विद्यमान अॅप्रॉनचा विस्तार : सध्या असलेल्या अॅप्रॉनची क्षमता वाढवणे.

नवीन टॅक्सी वे : सुरक्षित धावपट्टी हालचालींसाठी नवीन टॅक्सी बेची निर्मिती.

विस्तारानंतर प्रवासी क्षमता होणार तीनपट

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा साजरा होत आहे. या काळात देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ओझर विमानतळाचा कायापालट करण्यात येत आहे. राज्य शासनाने या विस्तारीकरणासाठी ५६० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे, या विकासकामांमुळे विमानतळाची सध्याची प्रवासी क्षमता बेट तीनपटीने वाढणार आहे.

सुरक्षेचे कडक नियम आणि अटी

एरोड्रम सल्लागार समितीने या कामाला मंजुरी देताना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. कामादरम्यान विमान वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून प्रमाणित कार्य पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. तसेच, दररोजच्या कामाची व विमानांच्या संचालनाची माहिती विमानतळ हवाई वाहतूक सेवेला देणे बंधनकारक केले आहे.

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Web Title: Ozhar airport expansion approved before simhastha kumbh nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Nashik

संबंधित बातम्या

नाशिक रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे फडणवीसांचे निर्देश
1

नाशिक रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे फडणवीसांचे निर्देश

नाशिक हादरले! शासकीय आश्रमशाळेतील ९ वीच्या विद्यार्थीनीने दिला बाळाला जन्म, नात्यातील मुलासोबत होते अनैतिक संबंध
2

नाशिक हादरले! शासकीय आश्रमशाळेतील ९ वीच्या विद्यार्थीनीने दिला बाळाला जन्म, नात्यातील मुलासोबत होते अनैतिक संबंध

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ
3

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ

Nashik News : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दुगारवाडी धबधबा, हरिहर गड बंद; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय
4

Nashik News : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दुगारवाडी धबधबा, हरिहर गड बंद; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.