कुटुंबातील तरण्याताठ्या पिढीवर काळाचा घाला; कार- बाईकच्या धडकेत चिमुकल्यासह 7 जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)
Nashik accident News Marathi : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अल्टो कार आणि मोटारसायकलची जोरदार धडक झाली. या अपघातात चिमुकल्यासह 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कार आणि मोटारसायकलच्या धडकेत आणखी दोन जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उशिरा दिंडोरी शहराजवळ हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यामध्ये मोटारसायकल आणि अल्टो कार यांच्यात झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, दुचाकी आणि अल्टो कारची दरम्यान मोठी टक्कर झाली. धडकेनंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अल्टो कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली, ज्यामुळे अपघात अधिक गंभीर झाला. अपघाताची तक्रार दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या भीषण अपघातातील मृतांची यादी आता समोर आली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये एकत्र गेले होते. कार्यक्रम आटोपून परत गावाकडे जात असताना दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
धडकेनंतर ल्टो कार रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटली आणि कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. कारमध्ये पाणी भरल्यामुळे नाका व तोंडात पाणी गेल्याने श्वास घेता न आल्याने कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. या अपघाताची नोंद दिंडोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दिंडोरी तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये देविदास पंडित गांगुर्डे (२८), मनीषा देविदास गांगुर्डे (२३), भावेश देविदास गांगुर्डे (२), ओ तिघे सरसाळे, ता. दिंडोरी, जिल्हा यांचा समावेश आहे. ते नाशिकचे रहिवासी आहेत. तसेच, उत्तम एकनाथ जाधव (४२) आणि अलका उत्तम जाधव (३८) ओ कोशिंबे, ता. दिंडोरी येथील रहिवासी असुन, दत्तात्रय नामदेव वाघमारे (४५) आणि अनुसया दत्तात्रय वाघमारे (४०) हे देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी येथील रहिवासी आहेत.
या अपघातात मोटारसायकलवरून प्रवास करणारे मंगेश यशवंत कुरघडे (२५) आणि अजय जगन्नाथ गोंड (१८) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजय गोंड हे मूलाचे नाडगे, ता. जव्हार, जिल्हा. पालघर येथील असुन सध्या सातपूरच्या भोला पिंपळगाव परिसरात राहतात.