Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सरशी लढाई महिलेने जिंकली पण धरणात बुडून मरण पावली; सेल्फीचा ‘तो’ नाद बेतला जीवावर

विसर्जन आटोपल्यानंतर पुलावर उभे राहून मोबाईलमध्ये फोटो काढत असताना अचानक हवेच्या झोतामुळे गिता यांचा तोल गेला आणि त्या थेट डॅमच्या खोल पाण्यात कोसळल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 03, 2026 | 02:55 PM
अंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू; मित्रांच्या डोळ्यांदेखत वाहून गेल्याने खळबळ

अंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू; मित्रांच्या डोळ्यांदेखत वाहून गेल्याने खळबळ

Follow Us
Follow Us:

नाशिक : नाशिकरोड परिसरातील चेहेडी डॅम येथे शुक्रवारी (दि. १) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. धार्मिक साहित्याचे विसर्जन करून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून पाण्यात पडल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. गिता रंजन दास (५२, रा. सिद्धार्थनगर, शिर्डी, ह.मु. नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे.

दास कुटुंब मूळचे शिर्डी येथील रहिवासी असून, गेल्या काही दिवसांपासून ते नाशिकमध्ये वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गिता दास आणि त्यांचे पती रंजन दास हे घरातील धार्मिक साहित्याचे विसर्जन करण्यासाठी चेहेडी डॅम परिसरात गेले होते. विसर्जन आटोपल्यानंतर पुलावर उभे राहून मोबाईलमध्ये फोटो काढत असताना अचानक हवेच्या झोतामुळे गिता यांचा तोल गेला आणि त्या थेट डॅमच्या खोल पाण्यात कोसळल्या. पत्नी पाण्यात पडल्याचे पाहून रंजन दास यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, परिसरात वेळीच मदत उपलब्ध होऊ शकली नाही.

दरम्यान, काही काळानंतर त्यांना पाण्याबाहेर काढून दुपारी एक वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप पवार यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दुर्दैवाची बाब म्हणजे गिता दास यांनी काही काळापूर्वीच कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार घेऊन यशस्वी मात केली होती. या आजाराशी लढण्यासाठी त्यांनी अनेक व्यक्ती व संस्थांकडून आर्थिक मदतही घेतली होती.

मावळ तालुक्यातही दुर्घटना

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि. १) दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने झडप घालत जाधववाडी धरणात सेल्फी घेण्याच्या नादात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. याच दिवशी पवना नदी येथेही एका तरुणाचा जीव गेल्याने मावळमध्ये एकाच दिवसात चार जणांचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

जाधववाडी धरणावर घडली दुर्घटना 

मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरणावर ही दुर्घटना घडली आहे. धरणात पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याची खोली न समजल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके अशी मृत तरुणांची नावे असून ते तिघेही पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरातील रहिवासी होते. भोसरी एमआयडीसीतील खासगी कंपनीत काम करणारे हे तरुण मूळचे परभणी जिल्ह्यातील होते. सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत मावळमध्ये फिरण्यासाठी आले असताना ही दुर्घटना घडली आहे.

हे सुद्ध वाचा : चाकण हादरलं ! 3 वर्षांच्या मुलावर अत्याचार करून निर्घृण खून, नागरिकांमध्ये संतापाची लाट

Web Title: Woman drowns in dam incident in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Nashik Crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.