Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरेंनंतर Sharad Pawar, ममतांनाही निवडणूक आयोगाचा दे धक्का..राष्ट्रीय पक्ष ही ओळखच केली बाद, पुढं काय?

निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबतची घोषणा केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 10, 2023 | 08:59 PM
उद्धव ठाकरेंनंतर Sharad Pawar, ममतांनाही निवडणूक आयोगाचा दे धक्का..राष्ट्रीय पक्ष ही ओळखच केली बाद, पुढं काय?
Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय (Loses National Party Tag) केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या तृणमुल काँग्रेस (Trinamul Congress) आणि सीपीआय (CPI) या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे.

१० जानेवारी २००० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा कायम होता. पण २०१४ निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षासंदर्भात त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालँड या ठिकाणचे राष्ट्रवादीचे अस्तित्व कमी झालेले आहे.

निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबतची घोषणा केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Election Commission withdraws national party status of Trinamool Congress, CPI — Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023
Nationalist Congress Party loses national party tag: EC — Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे. २०१४ नंतरच्या सलग दोन लोकसभा निवडणुका आणि २०१९ नंतर २१ पैकी १२ राज्यांच्या विधानसभेत राष्ट्रवादीची कामगिरी लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

[read_also content=”११ महिलांसह सामूहिक बलात्काराचा आरोप असलेल्या १३ पोलिसांची निर्दोष मुक्तता, ‘असं’ केल्याबद्दल न्यायालयाने उपटले कान https://www.navarashtra.com/crime/update-andhra-pradesh-13-cops-acquitted-in-2007-vakapalli-gang-rape-case-nrvb-382936/”]

राष्ट्रवादी काँग्रेससोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आहे. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी सहा टक्के मते असतील किंवा लोकसभेच्या निवडणुकीत तीन किंवा जास्त राज्यामध्ये किमान दोन टक्के मते असतील तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच निवडणूक चिन्ह मिळते. त्याशिवाय नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयाला जागा मिळते. निवडणुकीमध्ये दुर्दशन अथवा इतर सार्वजनिक वाहिन्यावर ब्रॉडकॉस्टिंगसाठी वेळ मिळतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर या सर्वासाठी पक्ष अपात्र ठरतात.

पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढताना लोकसभा २०१९ चे नियम लक्षात घेतले आहेत. त्यानंतर ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या आहेत. तेथील आकडेवारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षासह तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

[read_also content=”पोटात गेल्यानंतर औषधाचं काम करतं माठातलं पाणी, नैसर्गिक फिल्टरचे ‘हे’ आहेत फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/ayurvedic-doctor-shared-matka-water-benefits-for-health-know-how-to-store-drinking-water-in-earthen-or-clay-pot-nrvb-382901/”]

जी काही कायदेशीर पावले उचलायची ती उचलू

१५ दिवसांपूर्वी आम्ही आमचे म्हणणं निवडणूक आयोगासमोर मांडले होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हा लोकसभा आणि विधानसभामध्ये आम्ही चांगले यश मिळवले. तेव्हापासून आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. त्यानंतरच्या सर्व लोकसभा निवडणुकामध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवण्यासाठी जी काही मतांची बेरीज संबंध देशभरात मिळवावी लागते, ती टक्केवारी आम्हाला मिळाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने आम्हाला स्पष्टीकरण मागितले होते. ते आम्ही दिलेय. त्यांनी घेतलेल्या निर्णायाचा तपशील घेऊन.. जी काही कायदेशीर पावले उचलायची ती उचलू.

सुनील तटकरे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Nationalist congress party ncp trinamul congress cpi loses national party tag nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2023 | 08:45 PM

Topics:  

  • mamta banerjee
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड
1

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

Mira Bhayandar Election : उमेदवारी अर्ज दाखल केला अन् काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मृत्यू
2

Mira Bhayandar Election : उमेदवारी अर्ज दाखल केला अन् काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मृत्यू

Latur Municipal Election 2026: महायुतीत मिठाचा खडा; भाजप’चा स्वबळाचा नारा
3

Latur Municipal Election 2026: महायुतीत मिठाचा खडा; भाजप’चा स्वबळाचा नारा

Maharashtra Politics: उमेदवारीवरून राडा! अजित पवारांना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
4

Maharashtra Politics: उमेदवारीवरून राडा! अजित पवारांना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.