Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supriya Sule Meets PM Modi: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ८ खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार

सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच परिसीमनाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत दिले आहेत. प्रस्तावित बदलांमध्ये देशातील सर्व राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये समान पद्धतीने वाढ करण्यात आली, तरच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परिसीमन प्रक्रियेला पाठिंबा देण्याचा विचार केला जाऊ करू शकतो, असे सुप्रिया सुळेनी आधीच स्पष्ट केलं आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 10, 2026 | 10:17 AM
Pune Airport Construction NOC Applications Surge News :

Pune Airport Construction NOC Applications Surge News :

Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला तातडीने मदत पुरवावी
  • देशातील सर्व राज्यांमध्ये लोकसभा जागांची वाढ समान पद्धतीने झाल्यासच समर्थन देणार
  • देशभरातील एकूण लोकसभा मतदारसंघांची संख्या किमान ५० टक्क्यांनी वाढवण्याची अट
Maharashtra Politics: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. यावेळी त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे आठ खासदारदेखील उपस्थित राहणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची आज सकाळी 11 वाजता संसदेत ही भेट होणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील काही भागातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत या भेटीत चर्चा केली जाणार अल्याची प्राथमिक माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. दरम्यान या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणार का याकडेही लक्ष लागलं आहे

मतदारसंघातील प्रश्नांवरही होणार चर्चा

या बैठकीत NCP (SP)चे खासदार महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघातील समस्या आणि विकासाशी संबंधित मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सध्या केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमात असलेला परिसीमनाचा मुद्दाही या चर्चेत महत्त्वाचा ठरू शकतो. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होत असल्याने या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सुप्रिया सुळेंच्या भूमिकेमुळे चर्चेला उधाण

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच परिसीमनाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत दिले आहेत. प्रस्तावित बदलांमध्ये देशातील सर्व राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये समान पद्धतीने वाढ करण्यात आली, तरच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परिसीमन प्रक्रियेला पाठिंबा देण्याचा विचार केला जाऊ करू शकतो, असे सुप्रिया सुळेनी आधीच स्पष्ट केलं आहे. तसेच,
देशभरातील लोकसभा मतदारसंघांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवण्याची तरतूद विधेयकात करण्यत आली तरच प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा विचार करू, असे सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयकावर सरकारचा भर

केंद्र सरकारकडून महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन विधेयक या दोन्ही मुद्द्यांचा प्राधान्याने समावेश करणार असल्याचे सांगत आहे. परिसीमनाच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर महिला आरक्षणाच्या तरतुदी लागू करण्याच्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण या मुद्द्यांवरून संसदेत सरकार आणि विरोधकांमध्ये सातत्याने मतभेद उफाळून येत आहेत. त्यामुळे विविध पक्षांच्या खासदारांशी चर्चा करून सहमती निर्माण करण्याचे प्रयत्न केंद्राकडून सुरू असल्याचे दिसत आहे.

‘NDAकडे पुरेसे संख्याबळ’ – पंतप्रधान मोदी

दरम्यान, महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक मंजूर करण्यासाठी लोकसभेत NDAकडे आवश्यक संख्याबळ असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. सरकारला आतापर्यंत सुमारे 366 खासदारांचा पाठिंबा मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, संसदेतील विरोधी पक्षांचा विरोध कायम राहिल्यास आणि सध्याच्या पावसाळी अधिवेशनात या विधेयकांवर चर्चा न झाल्यास, केंद्र सरकार महिन्याच्या अखेरीस संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या पर्यायावरही विचार करू शकते, अशीही माहिती आहे.

NCP (SP)च्या भूमिकेकडे लक्ष

शरद पवार गटाच्या खासदारांनी पंतप्रधान कार्यालयाकडे भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती असून, आज 10 ऑगस्ट रोजी ही भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भेटीत मतदारसंघातील प्रश्नांसोबतच परिसीमन प्रक्रिया आणि महिला आरक्षणासारख्या महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याआधी सुप्रिया सुळे यांनी परिसीमनाबाबत दिलेल्या संकेतांमुळे या संभाव्य भेटीचे राजकीय महत्त्व आणखी वाढले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या चर्चेनंतर NCP (SP)चा परिसीमन विधेयकाबाबत नेमका काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Supriya sule led ncp sp mps to meet pm narendra modi in parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • Breaking News
  • Maharashtra Politics
  • narendra modi
  • Nationalist Congress Party
  • Sharad Pawar
  • supriya sule

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
2

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
3

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
4

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.