Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Mumbai President: पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?

NCP Mumbai President: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर काही महत्त्वाचे बदल होण्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आमदार तथा विधान परिषद सदस्य झिशान सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा असल्याचे वृत्त आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 13, 2026 | 03:49 PM
पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?

पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे; झिशान सिद्दीकींवर मुंबईची जबाबदारी?

Follow Us
Follow Us:
  • पार्थ पवारांच्या ‘एंट्री’नंतर राष्ट्रवादीत नवी समीकरणे
  • राष्ट्रवादीत मोठे संघटनात्मक बदल?
  • मुंबई अध्यक्षपदासाठी झिशान सिद्दीकींच्या नावाची चर्चा
NCP Mumbai President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात नेतृत्वाची सूत्रे आता सुनेत्रा पवार यांच्याकडे गेल्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबई अध्यक्षपदासाठी झिशान सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रक्रियेत पार्थ पवार लक्ष घालत असल्याचेही वृत्त आहे. मात्र, ही नियुक्ती अद्याप अधिकृत झालेली नसून, सध्या पक्षांतर्गत चर्चेच्या पातळीवरच हे नाव पुढे आले आहे.

झिशान सिद्दीकी कोण आहेत?

झिशान सिद्दीकी हे दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र असून त्यांनी २०१९ मध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकली होती. २०२४ मध्ये त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत; मे २०२६ पासून त्यांचा विधान परिषद कार्यकाळ सुरू झाला आहे.

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडून संधी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागेसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. मात्र, पक्षाने झिशान सिद्दीकी यांना संधी दिली. त्यानंतर आता थेट मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पार्थ पवारांची भूमिका चर्चेत

राष्ट्रवादीच्या नव्या नेतृत्वाच्या काळात पार्थ पवार यांचा पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत वाढता सहभागही चर्चेचा विषय ठरत आहे. पार्थ आणि त्यांचे बंधू जय पवार यांचा पक्षाच्या अंतर्गत कोअर ग्रुपमध्ये समावेश झाल्याचे यापूर्वी वृत्त आले होते. सुनेत्रा पवार यांनी मात्र त्यावेळी काही नावे समाविष्ट होण्यामागे प्रशासकीय/क्लेरिकल चुकीचा संदर्भ दिला होता. मुंबईसारख्या महत्त्वाच्या राजकीय केंद्राची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय राष्ट्रवादीसाठी आगामी काळात महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे झिशान सिद्दीकी यांच्या नावावरील चर्चा प्रत्यक्ष निर्णयात बदलते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Politics: केंद्रात दोन मंत्रिपदे, शरद पवारांना भाजपची ऑफर, भाजप-राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार?

Web Title: Ncp mumbai president zeeshan siddique parth pawar internal changes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Mumbai
  • Nationalist Congress Party
  • parth pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
2

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
4

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.