Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panvel Fire News: पनवेलमध्ये २४ तासांत आगीच्या २८ घटना; अग्निशमन दलाची दिवसभर धावपळ!

Panvel Fire News: पनवेलमध्ये गेल्या २४ तासांत आगीच्या तब्बल २८ घटना घडल्याने अग्निशमन दलाची मोठी धावपळ उडाली. पनवेल, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल परिसरात आगीच्या घटना घडल्या. यामध्ये तळोजा एमआयडीसीबाहेरील साई पॅकिंग येथील आगीची घटना प्रमुख ठरली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 09, 2026 | 05:55 PM
पनवेलमध्ये २४ तासांत आगीच्या २८ घटना; अग्निशमन दलाची दिवसभर धावपळ!

पनवेलमध्ये २४ तासांत आगीच्या २८ घटना; अग्निशमन दलाची दिवसभर धावपळ!

Follow Us
Follow Us:
  • पनवेलमध्ये २४ तासांत आगीच्या २८ घटना;
  • अग्निशमन दलाची धावपळ
  • पनवेल, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल परिसरात आगीच्या घटना
  • तळोजा एमआयडीसीबाहेरील साई पॅकिंगची घटना प्रमुख
पनवेल ग्रामीण: पनवेल महानगरपालिका हद्दीसह परिसरात गेल्या २४ तासांत आगीच्या तब्बल २८ घटनांची नोंद झाली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत विविध ठिकाणांहून आगीबाबतचे कॉल प्राप्त झाले. या घटनांमध्ये कचरा, गवत, झाडे तसेच इमारती आणि इतर ठिकाणी आग लागल्याच्या प्रकारांचा समावेश आहे. (Panvel Fire News)

सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.या घटनांमध्ये कचरा, गवत, झाडे आणि डोंगराला आग लागण्याच्या प्रकारांचा समावेश आहे. पनवेलमधील पुष्पकनगर येथे डोंगराला आग लागली. साईनगर येथील साई डेव्हलपर्स, कामठी हाऊस इमारत आणि इतर ठिकाणीही अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

बिल्डरच्या सांगण्यावरून नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटिसा? KDMC सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्यावर कारवाईची मागणी

गवताला आग लागण्याच्या घटना

कळंबोली केंद्राच्या हद्दीत रोडपाली सेक्टर २० येथे कचरा आणि गवताला आग लागण्याच्या घटना घडल्या. कामोठे सेक्टर ३६, तळोजा फेज एक, मेट्रो डेपो परिसर, खुटारी गाव आणि नांबचे गाव येथील गोदामाला लागलेल्या आगीचाही अहवालात समावेश आहे. कामोठे परिसरात विविध सोसायट्या आणि कॉम्प्लेक्समध्ये सात वेळा अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली. नवीन पनवेलमध्ये दिल्ली विची परिसरात कचऱ्याला, तर शांती कॉलनी सेक्टर पाच येथे झाडाला आग लागली.

दरम्यान, साई पॅकिंग येथे तळोजा औद्योगिक क्षेत्राच्या हद्दीबाहेर लागलेल्या आगीची प्रमुख घटना म्हणून स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या अहवालानुसार, एकूण २८ कॉलपैकी २७ किरकोळ स्वरूपाचे, तर एक प्रमुख स्वरूपाचा होता. २४ तासांत आगीच्या घटनांची ही संख्या लक्षवेधी ठरली आहे. सुदैवाने सर्व घटनांमध्ये जीवितहानी शून्य असल्याने मोठा अनर्थ टळला.

तळोज्यातील साई पॅकिंगला आग

पनवेल अग्निशमन दलाच्या २४ तासांच्या अहवालात तळोजा औद्योगिक क्षेत्राच्या हद्दीबाहेरील साई पॅकिंग येथे लागलेल्या आगीची प्रमुख घटना म्हणून नोंद करण्यात आली आहे. ८ नोव्हेंबर सकाळी ८ ते ९ नोव्हेंबर सकाळी ८ या कालावधीत घडलेल्या एकूण २८ अग्निशमन कॉलपैकी ही एकमेव प्रमुख स्वरूपाची घटना होती. उर्वरित २७ घटना किरकोळ स्वरूपाच्या होत्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अहवालात देण्यात आली आहे.

Mumbai News: “मी फक्त दुचाकीजवळ फटाके फोडू नका म्हणालो होतो…” मुंबईत क्षुल्लक वादातून ५ नराधमांनी तरुणाला…

💡

Frequently Asked Questions

  • Que: पनवेलमध्ये २४ तासांत आगीच्या किती घटना घडल्या?

    Ans: पनवेल परिसरात २४ तासांत आगीच्या एकूण २८ घटना घडल्या.

  • Que: कोणत्या भागांमध्ये आगीच्या घटना घडल्या?

    Ans: पनवेल, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल परिसरात आगीच्या घटना घडल्या.

  • Que: कोणती घटना प्रमुख ठरली?

    Ans: तळोजा एमआयडीसीबाहेरील साई पॅकिंग येथे घडलेली आगीची घटना प्रमुख ठरली.

Web Title: Panvel 28 fire incidents in 24 hours fire brigade busy sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Fire
  • Navi Mumbai
  • panvel

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये आगीचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग; फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
1

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये आगीचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग; फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम
2

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम

Dharashiv Fire News: दोन चिमुकल्यांसह तीन पिढ्या संपल्या! किराणा दुकानाला लागलेल्या आगीत लगतचे घरही जळून खाक
3

Dharashiv Fire News: दोन चिमुकल्यांसह तीन पिढ्या संपल्या! किराणा दुकानाला लागलेल्या आगीत लगतचे घरही जळून खाक

Navi Mumbai News: महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा! सेवानिवृत्त आणि दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही मिळणार सानुग्रह अनुदान
4

Navi Mumbai News: महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा! सेवानिवृत्त आणि दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही मिळणार सानुग्रह अनुदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.