रेल्वे जाळे विस्तारणार! 400 किमीचे नवीन रेल्वे नेटवर्क, उपनगरीय मार्गावर तीन हजार फेऱ्या
या प्रकल्पांमुळे उपनगरीय रेल्वेचे जाळे ४००.५३ किलोमीटरने वाढणार आहे. यातील अनेक प्रकल्प दोन ते पाच वर्षापर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे उपनगरीय लोकल तसेच मेल-एक्सप्रेसची संख्या आणि वत्तशीरपणा वाढण्यास मदत होणार आहे. मुंबईत लोकलचे जाळे ३९० किमीपर्यंत पसरले आहे. यात तीन प्रमुख मार्ग आहेत. नेरुळ-बेलापूर ते उरण दरम्यान चौथा मार्ग कार्यरत आहे. या मार्गावर सुमारे अंदाजे ६५ लाख प्रवासी प्रवास करतात. पनवेल, बदलापूर, कर्जत, उरण, विरार भागात सामान्य नागरिकांना दरवडणाऱ्या दरातील गृहसंकुलाची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. त्यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते आहे.
पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे लांबी २९.६ कि.मी. खर्च २७८२ कोटी
ऐरोली-कलवा एलिव्हेटेड मार्ग
लांबी ३.३ कि. मी. खर्च ३.५०८ कोटी
कल्याण-आसनगाव चौथा मार्ग
लांबी ३२ कि.मी. खर्च १,७५९ कोटी
कल्याण-बदलापूर तिसरा-चौथा मार्ग लांबी १४.०५ कि. मी. खर्च १.५१० कोटी
कल्याण-कसारा तिसरा मार्ग
लांबी ६७.३५ कि. मी. खर्च ७९२.८९ कोटी
निळजे-कोपर डबल कॉर्ड लाइन
लांबी ५ कि.मी. खर्च ३३८ कोटी
बदलापूर-कर्जत तिसरा चौथा मार्ग
लांबी ६४ किमी. खर्चः १,३२४ कोटी
आसनगाव-कसारा चौथा मार्ग
लांबी ३५ किमी खर्च ०३७.८५ कोटी
एकूण १८,३६४.९४ खर्च कोटी
एकूण ४००.५३ लांबी कि.मी
मुंबई सेंट्रल बोरिवली सहावा मार्ग
लांबी ३० कि मी, खर्चः ९१९ कोटी
गोरेगाव-बोरिवली हार्बर लाइन विस्तार
लांबी ७ कि. मी., खर्च ८९८ कोटी
गोरेगाव-मालाड विभागाचे काम मार्च २०२८
मालाड-बोरिवली विभागाचे काम डिसेंबर २०२८
बोरिवली- विरार पाचवा सहावा मार्ग
लांबी २६ कि. मी. खर्च २.१८४ कोटी
विरार-डहाणू सेड तिसरा चौथा मार्ग
लाबी ६५ कि. मी. खर्च ३.५८७ कोटी
नायगाव-जुर्वेद डबल कॉर्ड लाईन लांबी ६ कि.मी. खर्च १७६ कोटी
पाचवी-सहावी मार्ग सीएसएमटी-कुलर्ता आणि मुंबई सेंट्रल-बोरिवली दरम्यानच्या मार्गामुळे मेल-एक्सप्रेस आणि लोकलकरिता स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होतील.
कल्याण-कसारा आणि कल्याण-बदलापूर तिसरा चौशा मार्गः या प्रकल्पामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगळ्या मार्गिका तयार होतील.
पनवेल-कर्जत उपनगरी मार्ग पनवेल ते कर्जत घंट लोकलने प्रवास करता येईल.
ऐरोली-कलवा एलिव्हेटेड मार्ग या प्रकल्पामुळे ठाणे स्थानकावरील वाग कमी होउन नवी मुंबईतून थेट कल्याणला जाता येईल.
विरार-डहाणू तिसरा-चौथा मार्ग लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढून संख्या वाढणार आहे.
नायगाव-जुचंद्र आणि निळजे कोपर डबल कॉर्ड लाइन: लोकलच्या फेऱ्याऱ्यांमध्ये वाढ.






