Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : कॅन्सर नोंदणी सुरू करणारी पहिली महानगरपालिका ; नवी मुंबई मनपाची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी केलं कौैतुक

नवी मुंबई महानगरपालिकेकरिता कॅन्सर रूग्णांच्या नोंदणीसाठी टाटा ॲक्ट्रेक यांचेकडून मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आहेत. नवी मुंबई मनपाचं आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल असल्याने पालिकेची प्रशंसा केली जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 30, 2025 | 07:46 PM
Navi Mumbai : कॅन्सर नोंदणी सुरू करणारी पहिली महानगरपालिका ; नवी मुंबई मनपाची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी केलं कौैतुक
Follow Us
Close
Follow Us:

 

 

  • कॅन्सर रजिस्ट्री सुरू करणारी पहिली महानगरपालिका
  • नवी मुंबई मनपाची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून प्रशंसा
  • नवी मुंबई मनपाचं आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल
नवी मुंबई/ सिद्धेश प्रधान : महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयामध्ये कर्करोग नोंदणी विभाग कार्यरत असून याठिकाणी ॲक्ट्रेक अर्थात खारघर येखील प्राध्यापक आणि ऑफिसर इनचार्ज डॉ अतुल बुडुख यांचेसमवेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉ. मॅग्डालेना पॅच्कोन्स्की, डॉ अर्पिता पाल यांनी भेट देऊन पाहणीअंती या उपक्रमाची प्रशंसा केली. सदर पथकाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पावणे येथेही भेट देऊन पाहणी केली.

इलेक्ट्रीक वाहनांसाठी पहिल्या टप्यात सुरू होणार ८ चार्जिंग स्टेशन, नवी मुंबईत मिळणार जागा

या भेटीदरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, पॅथोलॉजिस्ट डॉ संगीता बनसोडे यांनी कॅन्सर रजिस्ट्रीबाबत माहिती देताना महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, कर्करोग नोंदणी विभाग दि.11 ऑक्टोबर 2024 पासून महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ येथे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांच्या नियंत्रणाखाली सुरू असल्याचे सांगितले.

या विभागांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवाशी असणा-या कर्करोग रूग्णांची नोंदणी करण्यात येते. या माध्यमातून नमुंमपा कार्यक्षेत्रातील कॅन्सरग्रस्त रूग्णांची संख्या, कॅन्सरमुळे होणारे मृत्यू व कोणत्या प्रकारच्या कॅन्सरचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आहे. याबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. भविष्यात सदर माहितीचा उपयोग कर्करोगविषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा विकसित करण्याकरिता होणार आहे.

डॉ. मॅग्डालेना पॅच्कोन्स्की व डॉ अतुल बुडुख यांनी सर्व महानगरपालिकांमध्ये कॅन्सर रजिस्ट्री सुरू करणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असून 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शासन/ महानगरपालिका संस्थामध्ये देखील ही पहिलीच महानगरपालिका असल्याचे सांगत प्रशंसा केली व हा उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेने सुरू केल्याबद्दल अभिनंदन केले.

आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाहणीत पितळ पडले उघडे, ठाण्यातील तीन आरोग्य मंदिरे बंदच

नवी मुंबई महानगरपालिकेकरिता कॅन्सर रूग्णांच्या नोंदणीसाठी टाटा ॲक्ट्रेक यांचेकडून मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणार असून तेथील तज्ज्ञ नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरून नवी मुंबई महानगरपालिकेच्या या प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून देणेकरिता शिफारस तसेच कॅन्सर रजिस्ट्रीचे आंतरराष्ट्रीय सदस्यत्व नवी मुंबई महानगरपालिकेस देणेबाबत कार्यवाही करण्यात येईल असेही टाटाअ‍ॅक्ट्रेकचे ऑफिसर इनचार्ज डॉ अतुल बुडुख यांनी सांगितले.

Web Title: Navi mumbai first municipal corporation to start cancer registry navi mumbai municipal corporation praised by international experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 07:43 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

‘योग्य सन्मान मिळाला तर ठीक, तुच्छ लेखलेत तर…’ शंभूराज देसाई गरजले, सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान आव्हान
1

‘योग्य सन्मान मिळाला तर ठीक, तुच्छ लेखलेत तर…’ शंभूराज देसाई गरजले, सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान आव्हान

दीर्घ काळापासून रखडलेला वाशी डेपो खुला; मात्र अन्यत्र जाणाऱ्यांची गैरसोय कायम
2

दीर्घ काळापासून रखडलेला वाशी डेपो खुला; मात्र अन्यत्र जाणाऱ्यांची गैरसोय कायम

नैनाच्या अधिकाऱ्याला व उपअधीक्षकाला सहा लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक
3

नैनाच्या अधिकाऱ्याला व उपअधीक्षकाला सहा लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

Kolhapur Corporation Elections : हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर शंखनाद आंदोलन
4

Kolhapur Corporation Elections : हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर शंखनाद आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.