आरोग्य मंदिराची तपासणी करताना संजय केळकर
ठाणेः बंद पडलेल्या आपला दवाखान्यांनंतर ठाणे महापालिकेने ४३ आरोग्य मंदिरे सुरू केल्याची माहिती आयुक्तांनी दिली. मात्र आमदार संजय केळकर यांनी पाहणी केल्यानंतर कोपरीतील तीन आरोग्य मंदिरे उद्घाटनानंतर बंद आणि त्यांच्या आजूबाजूला अस्वच्छता असल्याचे उघडकीस आले. ही ठाणेकरांची फसवणूक असून लवकरच जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा केळकर यांनी दिला.
ठेकेदारावर करण्यात आली दंडात्मक कारवाई
‘आपला दवाखाना’ बंद पडल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी जोरदार टीका करत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यास काळ्या यादीत टाकल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी केळकर यांना दिली, यावेळी आपला दवाखानाऐवजी ठाणे शहरात ४३ आरोग्य मंदिरे सुरू करण्यात आल्याची माहिती
आयुक्तांनी दिली. या पार्श्वभूमीवर केळकर यांनी ठाणे पूर्वेत मीठ बंदर रोह, धोबी घाट आणि बारा बंगला परिसरातील आरोग्य मंदिरांना भेट दिली असता ही मंदिरे बंदच असल्याचे आढळून आले. कंटेनरमध्ये ही आरोग्य मंदिरे असून उद्घाटनाच्या किती लीबकळत आहेत. उद्घाटनाचे बैनरही दिसख्त आहेत. ही मंदिरे बंद असून कचरा आणि चिखल अशी दुरावस्था असल्याचे केळकर वानी सांगितले.
५०० कोटी ११ लाखांची करवसुली, डिजिटल सुविधा-जनजागृतीमुळे करसंकलनात वाढ
लोकप्रतिनिधींना दिली जाते खोटी माहिती
याबाबत केळकर म्हणाले, चुकीच्या माणसांना काम दिल्याने आपला दवाखाना ही यंत्रणा बंद पडली. आता ठाण्यात गरीब गरजू लोकांसाठी ४३ आरोग्य मंदिरे सुरू करण्यात आल्याचे आयुक्तांचे म्हागणे आहे. यासाठी राज्य शासनाचा निधीही महापालिकेला मिळाला आहे. मात्र प्रत्यक्षात ही आरोग्य मंदिरे बंदच आहेत. लोकप्रतिनिधींना याबाबत खोटी माहिती प्रशासनाने दिली असून ठाणेकरांची ही घोर फस्वामुक आहे.
प्रसूतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावर एनआयसीयू बंद
येथील दोन मजली प्रसूती गृहातील दुसऱ्या मजल्यावरील एनआयसीयु विभागात लवकर जन्मलेल्या बालकांसाठी विशेष काळजी घेण्यासाठी २० इन्वयूबेटर ठेवण्यात आले आहेत, मात्र उद्द्घाटनानंतर सहा महिने उलटूनही हा विभाग सुरू करण्यात आलेला नाही. पहिल्या मजल्यावरील बालकाला इन्क्यूबेटरची गरज भासल्यास त्याला त्याचा लाभ मिळत नाही, त्याला
सिव्हिल रुगणालय किया खासगी रुग्णालयात पाठवण्याची पाळी येते. सिव्हिलमध्ये हा विभाग नेहमीच फुल असतो तर खासगी रुग्णालयाचा खर्च गरीब कुटुंबाना परवडत नाही. अशावेळी निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगून हा विभाग बंद ठेवण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे हास्यास्पद आणि संतापजनक असल्याचे केळकर म्हणाले.






