Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप

पालघरच्या गंभीर, मूलभूत आणि दीर्घकालीन समस्या वाऱ्यावर सोडून पालघरचे पालकमंत्री नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भायंदर या विकसित शहरांमध्ये जनता दरबार भरवून इतर खात्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 17, 2025 | 03:20 PM
Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:
  • जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी
  • समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप
नवी मुंबई :  पालघरच्या गंभीर, मूलभूत आणि दीर्घकालीन समस्या वाऱ्यावर सोडून पालघरचे पालकमंत्री नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भायंदर या विकसित शहरांमध्ये जनता दरबार भरवून इतर खात्यांच्या कारभारात हस्तक्षेप करत आहेत. त्यांच्या या जनता दरबाराला इतर विभागाचे अधिकारी दिवसभर कोणत्या अधिकारान्वये रुजू केले जातात ? स्वतःचे पालकत्व असलेल्या जिल्ह्यातील समस्या आणि राज्यभरातील बिबट्यांच्या दहशतीची समस्या मार्गी लावण्यात अपयशी ठरलेले वनमंत्री इतर जिल्ह्यात जनता दरबार घेतात याविरोधात शिवसेनेच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली असून मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी तिची सुनावणी घेतली जाणार आहे.

Palghar News : साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपीला भाजपकडून उमेदवारी ? पालघरमधील राजकीय वाद विकोपाला

पालघर जिल्ह्याच्या गंभीर, मूलभूत आणि दीर्घकालीन समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत आहे. पालघर जिल्हा निर्माण होऊन दहा वर्षे झाली, तरीही आदिवासी व ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न कायम आहेत. जिल्ह्यातील ३६,००० हून अधिक गरोदर महिलांपैकी तब्बल २,४४२ महिला १९ वर्षांखालील असून अल्पवयीन विवाह आणि अल्पवयीन मातृत्वाचा दुष्परिणाम आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. कुपोषणामुळे बालमृत्यूंची संख्या चिंताजनकरीत्या वाढत असून मोखाडा-जव्हारमध्ये कुपोषित बालके मोठ्या प्रमाणात आढळतात.

आश्रमशाळांमधील स्वच्छता, आहार, सुरक्षा यांचा बोजवारा उडाल्याने दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आदिवासी मुलांचे शिक्षण, पोषण, निवारा आणि संरक्षण यांमधील अपयश स्पष्ट दिसत असून जिल्ह्यातील लोकांमध्ये शासनाविषयी अविश्वास निर्माण झाला आहे.रुग्णवाहिकेचा अभाव, पावसाळ्यात बुडणारे पूल, जीव धोक्यात घालून शाळेत जाणारे विद्यार्थी, झोळीतून उचलून नेल्या जाणाऱ्या गर्भवती महिला या सर्व समस्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याची नागरिकांची तीव्र नाराजी आहे.

राज्यात सर्वत्र जंगली बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे,भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत येणाऱ्या बिबट्यांनी पुणे जिल्ह्यातील दोन मुलांचा जीव घेतल्याने वनखात्याच्या विरोधात तीव्र जनक्षोभ उसळला होता. या समस्येला वनमंत्री म्हणून पालघरचे पालकमंत्री न्याय देवू शकलेले नाहीत. असे असतांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र ठाणे ,नवी मुंबई आणि मीरा भायंदर येथे “जनता दरबार” घेण्यात गुंतले आहेत. जनता दरबारात पालघरचे पालकमंत्री ठाणे आणि नवी मुंबई मनपा क्षेत्रातील शासकीय यंत्रणेला वेठीस धरून ठेवतात. इतरांच्या खात्यात देखील वनमंत्री ढवळाढवळ करत असतात.

आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक निवडणुकीत सुनील भुसारा आणि दिलीप पटेकर विजयी!

ठेकेदारांना बोलवून त्यांच्यासमोर अधिकाऱ्यांची सरबत्ती करतात. सर्वच खात्यांच्या समस्यांचा निपटारा केल्याचा दावा जर वनमंत्री करत असतील तर मग इतर विभागांची खाती आणि अधिकारी तसेच लोकायुक्त हवेतच कशाला ? हा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. पालघर जिल्ह्यातील कुपोषण, अल्पवयीन मातृत्व, आश्रमशाळांमधील अराजकता, शिक्षण व आरोग्य सुविधा अभावी निर्माण झालेली भीषण परिस्थिती यांची भीषण वास्तवता कायम असताना तसेच राज्यभरातील जनतेला भेडसावणारा जंगली बिबट्यांच्या हल्ल्याचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेले वनमंत्री राजकीय कुरघोडी करण्यात मश्गुल असल्याची टीकाया निमित्ताने होत आहे.स्वतःचा जिल्हा सोडून एका जिल्ह्याचे पालकमंत्री दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन कोणत्या अधिकाराखाली जनता दरबार घेतात ? आणि सर्व विभागांचे शासकीय अधिकारी तिथे कोणत्या अधिकाराखाली बोलवले जातात ? सरकारी यंत्रणेला दिवसभर दरबारात थांबवून प्रशासनाची नियमित कामे ठप्प करण्यास कोण परवानगी देतो, या मुद्द्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी जनहित याचिका दाखल केली असून तिची सुनावणी येत्या १८ नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.

Web Title: Navi mumbai hearing on janata darbar petition on tuesday shiv sena alleges that problems are being continuously ignored

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • political news
  • shivsena

संबंधित बातम्या

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?
1

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
2

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Nanded News : अशोक चव्हाण यांचे स्वप्न उतरणार सत्यात? ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’चा प्रकाशन सोहळा पार
3

Nanded News : अशोक चव्हाण यांचे स्वप्न उतरणार सत्यात? ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’चा प्रकाशन सोहळा पार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार
4

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.