फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक पदासाठीची ही निवडणूक होती. ठाणे आणि पालघर जिल्हयातून २ संचालक निवडायचे होते. यासाठी चार उमेदवार रिंगणात होते. यामधून भाजपाकडून पॅनल बनविण्यात आला होता. तर भुसारा यांनी एकट्याने ही निवडणूक लढवत आपला विजय संपादन केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे मात्र दोन्ही जिल्ह्यातील या मतदारांपर्यंत जाऊन आपले सहकार क्षेत्रातील वर्चस्व देखील त्यांनी दाखवून दिले.या निवडीबाबत त्यांचे खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत अभिनंदन केले तर दोन्ही जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे भुसारा यांना महामंडळातील कामांचा चांगला अनुभव असल्याने शेतकरी बांधवांनी देखील आभार मानले आहेत.
” खरतर पक्ष विरहीत ही निवडणूक मी लढवली यामध्ये मी आणि राज्यातून सुद्धा अनेक ज्येष्ठ संचालक निवडून आले. सर्वप्रथम माझ्या मतदार बांधवांचे आभार मानतो तसेच प्रत्येक शेतकरी बांधव हा आमच्या महामंडळाचा कणा असून त्याच्या हितासाठी आता अधिक जोमाने काम करणार आहे.” असे सुनील भुसारा (संचालक, आदिवासी विकास महामंडळ) यांचे म्हणणे आहे.






