Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News : नरेश म्हस्के यांची संयुक्त बैठक संपन्न; महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना  

नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत विविध प्रश्न मार्गी लावण्यासंबंधीत सुचना देण्यात आल्या आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 11, 2025 | 06:49 PM
Navi Mumbai News :  नरेश म्हस्के यांची संयुक्त बैठक संपन्न; महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना  
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई : नवी मुंबईत नरेश म्हस्के यांची संयुक्त बैठक पार पडली आहे. घणसोली ते ऐरोली सेक्टर 10 ए उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात यावी, बाधितांना योग्य मोबदला तात्काळ द्यावा, नवी मुंबई महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी, ठाणे कोपरी ते नवी मुंबई एअरपोर्ट कॉरिडॉर रस्ता मार्गी लावण्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना करुन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आज निर्देशने दिले आहेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची त्यांच्या दालनात भेट घेत बैठक घेतली. नवी मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकी दरम्यान नवी मुंबई महापालिका व सिडको अधिकाऱ्यांकडून संयुक्त सादरीकरणही करण्यात आले आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये घणसोली ते ऐरोली सेक्टर 10 ए ला जोडणारा खाडीवर उड्डाणपुल (पाम बिच जोडणारा पूल) काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त वतीने उड्डणपुलाचे काम होणार आहे. त्याची वर्कऑर्डरही निघाली आहे. मात्र काम कासवगतीने सुरु आहे. पूलासाठी आवश्यक परवानग्या वेळेत न घेतल्यामुळे प्रकल्प रखडला आहे. यावर ठाणे खासदार नरेश म्हस्के यांनी लवकरात लवकर सर्व परवानग्या घेऊन कामास गती देण्याचे निर्देश दिले. यासोबतच या भागातील शेतकरी, मच्छीमार बांधवांना नुकसानभरपाई पोटी योग्य तो मोबदला मिळेल याची हमी देखील आयुक्तांनी बैठकीत दिली.

ठाणे कोपरी ते नवी मुंबई एअरपोर्ट कॉरिडॉर रस्ता करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या महत्वाकांक्षी रस्त्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. एनएमएमटी कर्मचारी अद्याप कायमसेवा न मिळाल्याने त्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न गंभीर आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी यावरही ठामपणे भूमिका घेत, कायम करण्याआधी तातडीने वेतनवाढ द्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले आहे.

या बैठकीस ऐरोली विधानसभा शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला संघटिका शीतलताई कचरे, युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, बेलापूर शहरप्रमुख  विजय माने, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तसेच महानगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, शहर अभियंता शिरीष अधरवाड आणि सिडको अधिकारी उपस्थित होते.  या बैठकीत नागरिकांच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि दिलेले निर्देश हे नवी मुंबईच्या विकास प्रक्रियेस चालना देणारे ठरणार आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

Web Title: Navi mumbai news naresh mhaskes joint meeting concluded important instructions given to municipal corporation and cidco officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 06:49 PM

Topics:  

  • Mumbai News
  • Naresh Mhaske
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

नवी मुंबईसाठी आणखी एक मेट्रो! पहिल्यांदाच विमानतळासह शहराच्या अंतर्गत भागांना जोडणारी एक नवीन मार्गिका
1

नवी मुंबईसाठी आणखी एक मेट्रो! पहिल्यांदाच विमानतळासह शहराच्या अंतर्गत भागांना जोडणारी एक नवीन मार्गिका

आपत्कालीन वैद्यकीय सेवांना मिळणार बळ, Apollo नवी मुंबईत ३ प्रगत रुग्णवाहिका दाखल
2

आपत्कालीन वैद्यकीय सेवांना मिळणार बळ, Apollo नवी मुंबईत ३ प्रगत रुग्णवाहिका दाखल

Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा
3

Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळ नामांतरण प्रश्नावर भूमिपुत्र आक्रमक; पायी चालत करणार आंदोलन
4

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळ नामांतरण प्रश्नावर भूमिपुत्र आक्रमक; पायी चालत करणार आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.