Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये नवी मुंबईचं अव्वल स्थान; ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर

शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने यावर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण 2024' करिता गुणांकन पध्दती बदललेली असून ‘सुपर स्वच्छ लीग’ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 17, 2025 | 03:48 PM
स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये नवी मुंबईचं अव्वल स्थान; ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर
Follow Us
Close
Follow Us:

शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ करिता गुणांकन पध्दती बदललेली असून ‘सुपर स्वच्छ लीग’ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण केली आहे. स्वच्छतेत नेहमीच अग्रभागी असणा-या शहरांऐवजी इतरही शहरांना क्रमवारीत पुढे येण्याची संधी मिळावी यादृष्टीने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ पर्यंत जी शहरे लागोपाठ 3 वर्षे किमान 2 वेळा टॉप थ्री मध्ये आहेत अशा शहरांसाठी ‘सुपर स्वच्छ लीग’ ही क्रमवारीपेक्षा उच्च अशी विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबईला सुपर स्वच्छ मानांकन झालेले आहे. त्यामुळे नवी मुंबईने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकन प्राप्त करीत आपली विजयपताका अक्षय फडकत ठेवली आहे. विशेष म्हणजे ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये समाविष्ट झालेल्या देशातील मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. यासोबतच कचरामुक्त शहराचे सर्वोच्च ‘सेव्हन स्टार मानांकन’ तसेच ओडीएक कॅटेगरीमध्ये सर्वोच्च ‘वॉटरप्लस’ मानांकन नवी मुंबईने कायम राखले आहे.

नवी मुंबईच्या या सातत्यपूर्ण स्वच्छता कार्याचा सन्मान नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात संपन्न झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ पारितोषिक वितरण सोहळ्यात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते, महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ व नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्विकारला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते.

नवी मुंबईचा समावेश स्वच्छतेत सातत्य राखणा-या देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये होणे ही प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचीही शान उंचाविली असल्याचा आनंद व्यक्त केला.

सुपर स्वच्छ लीगमधील ऐतिहासिक मानांकनाचे श्रेय सर्वांचे – आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे प्रतिपादन

नवी मुंबई शहराच्या या स्वच्छ सर्वेक्षणातील ‘सुपर स्वच्छ लीग’ मधील समावेशाचे व त्यामधील उच्च मानांकनाचे श्रेय आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्रीगणेश नाईक,नरेश म्हस्के, मंदाताई म्हात्रे यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, स्वच्छ नवी मुंबईचे ब्रँड ॲम्बेसेडर पद्मश्री शंकर महादेवन, पद्मश्री अच्युत पालव, शुभम वनमाळी यांचा पाठींबा, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारे स्वच्छतामित्र व स्वच्छतासखी आणि सफाईमित्र तसेच महापालिका अधिकारी – कर्मचारीवृंद, स्वच्छताप्रेमी नागरिक, विविध क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था व मंडळे, महिला संस्था व मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघटना, तृतीयपंथी नागरिक, पत्रकार, शिक्षक व प्रामुख्याने एनएसएस, एनसीसी व सर्व उत्साही विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा सर्व घटकांचा सक्रिय सहभाग यांना दिलेले आहे.

Web Title: Navi mumbai tops the list of swachh survekshan 2024 the only city in maharashtra included in the super swachh league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • maharashtra
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai : सामाजिक सेवेतून गणेशभक्तांची सेवा, सलग ११ वर्षांपासूनचं कार्य समाजासाठी आदर्श
1

Navi Mumbai : सामाजिक सेवेतून गणेशभक्तांची सेवा, सलग ११ वर्षांपासूनचं कार्य समाजासाठी आदर्श

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप
2

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

Navi Mumbai: पालिकेच्या तिजोरीत आता पर्यत विक्रमी वार्षिक कर भरणा; आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कर वसुली
3

Navi Mumbai: पालिकेच्या तिजोरीत आता पर्यत विक्रमी वार्षिक कर भरणा; आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कर वसुली

चक्क मेलेला माणूसच झाला जिवंत! अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, ‘ब्रेन डेड’ घोषित केलेल्या तरुणाला आला अचानक खोकला…
4

चक्क मेलेला माणूसच झाला जिवंत! अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, ‘ब्रेन डेड’ घोषित केलेल्या तरुणाला आला अचानक खोकला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.