मुंबई : ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’चे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि इतर तिघांवर यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. अनेक सेलिब्रिटींना धडकी भरवणार अधिकारी अशी वानखेडे यांची ओळख बनली आहे. त्यांनी जेव्हा आर्यन खान (Aaryan Khan Case) प्रकरणाचा तपास करत आर्यन खानला जेव्हा अटक केली तेव्हा त्यांचे नाव सर्वांना परिचयाचे झाले. मात्र, आता देखील हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय आहे.
एनसीबीचे व्हिजलन्स ऑफिसर या प्रकरणाची चौकशी करत आहेत. वानखेडे जेव्हा मुंबई एनसीबीचे प्रमुख होते तेव्हा त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. त्यावेळी वानखेडे यांनी पैशांचा घोळ केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर व्हिजलन्स टीम या आरोपांची चौकशी करत होती.
आता या टीमच्या हाती काही भक्कम पुरावे लागले आहेत. या आधारावर सीबीआयने समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमवर गुन्हा दाखल केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये सीबीआय समीर वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.