Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जळगावातील नुकसानग्रस्तांना सरसकट मदत मिळावी; आजी, माजी आमदारांची मुख्यमंत्री व मंत्र्यांकडे मागणी

जळगावमध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 29, 2025 | 10:29 PM
NCP leaders demand immediate assistance from Chief CM Fadnavis for the victims of Jalgaon

NCP leaders demand immediate assistance from Chief CM Fadnavis for the victims of Jalgaon

Follow Us
Close
Follow Us:

Jalgoan News: अमळनेर : तालुक्यात अवकाळी व सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे तात्काळ करून तातडीने मदत मिळावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमळनेर विधानसभा मतदार संघात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवकाळी आणि सततच्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण हातचा गेला आहे. आणि थोडेफार जे उत्पन्न येणार होते ते आताच्या अवकाळी पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे.

मतदार संघातील ८१ हजार २१२ हेक्टर लागवडीपैकी ४६ हजार ९४८ हेक्टर उभ्या कापसाचे पीक आणि काढणीला आलेल्या शेतात पडलेल्या २९ हजार ४१२ हेक्टर मका २५४४ हेक्टर ज्वारी ७४७ हेक्टर बाजरी आणि २०० हेकटर सोयाबीन यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या निकषानुसार फक्त उभ्या पिकाचा पंचनामा केला आहे. परंतु विशेष वाच म्हणून सरसकट पंचनामे करून सरसकट मदत करण्यात यावी असेही अनिल पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

 महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

माजी आमदारांचे पत्र

माजी आमदार साहेबराव पाटील यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बांधितांना सवलतसंह सरसकट मदतीची मागणी केली आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी म्हटले आहे की, “२० ऑक्टोबरच्या शासन निर्णयात नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यात अतिवृ‌धी व पूर यांचा कालावधी सप्टेंबर २०२५ असा असून ऑगस्ट २०२५ या कालावधीचा समावेश नाही याचे अवलोकन करावे, असे नमूद केले करून सरसकट मदत करावी,” अशी विनंती केली आहे.

२ हेक्टरऐवजी ३ हेक्टरसाठी मिळावी मदत

जळगाव जिल्ह्यासाठी २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टरसाठी मदत मिळावी. तसेच अतिवृष्टी वाढत्या तापमानामुळे कपाशीवर लाल्या रोग आणि मर रोग आल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकन्यांना सरसकट मदत करण्यात यावी अशी मागणी केली असून निवेदनाचा प्रति उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध आमदार आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. प्रामुख्याने कापूस मका, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. तरी प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना सरसकट तातडीने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. निवेदनावर माजी आमदार डॉ. वी एस पाटील, तालुकाध्यक्ष डी.एम. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार शहराध्यक्ष प्रशांत निकम, तालुका युवक अध्यक्ष योगेश शिस्रोदे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, वासुदेव मामा, शांताराम कोळी, महेंद्र लोहार, मांडल, कृष्णा पाटील, अनिल पाटीत जानवे, संजय मधुकर पवार, हरीश लाड पातोंडा चिंधू वानरडे चामुदेव पाटील, वसंत पाटील गांधली यांच्या सह्या आहेत

Web Title: Ncp leaders demand immediate assistance from chief cm fadnavis for the victims of jalgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 10:29 PM

Topics:  

  • Maharashtra Rain
  • NCP Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “औरंगजेबाचा DNA असणाऱ्यांनी उंदीर होऊन मुंबई पोखरली…; खासदार संजय राऊतांना भाजप नेत्यांनी डिवचलं
1

Maharashtra Politics: “औरंगजेबाचा DNA असणाऱ्यांनी उंदीर होऊन मुंबई पोखरली…; खासदार संजय राऊतांना भाजप नेत्यांनी डिवचलं

Monsoon News: अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
2

Monsoon News: अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा
3

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा

NCP Office Dance Video: राष्ट्रवादीचे कार्यालय की तमाशाचा फड? संबंधितांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कारणे दाखवा नोटीस
4

NCP Office Dance Video: राष्ट्रवादीचे कार्यालय की तमाशाचा फड? संबंधितांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कारणे दाखवा नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.