वैभव खेडेकरांना मोठा धक्का (फोटो- सोशल मीडिया)
वैभव खेडेकरांना बसला मोठा धक्का
नुकताच भाजपमध्ये केला आहे प्रवेश
मनसेमधून झाली होती हकालपट्टी
खेड: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी झालेले वैभव खेडेकरांबरोबर भाजपात प्रवेश केलेले मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी पुन्हा मनसेत दाखल झाले आहेत. जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली अन्य पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत गेले होते.
अविनाश सौंदळकर यांच्यासोबत उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, महिला पदधिकारी तसेच विविध तालुक्यांतील कार्यकत्यांच्या मोठ्या समूहाने राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे. यामुळे हा वैभव खेडेकरांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. यामुळे खेडेकर यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा मनसेला चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली आहे. अविनाश सौंदळकर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष (राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण), जुनेद बंदरकर उपजिल्हाध्यक्ष (राजापूर विधानसभा), अरविंद मालाडकर -उपजिल्हाध्यक्ष (रत्नागिरी विधानसभा) आदी कार्यकत्यांनी पुन्हा पक्षप्रवेश केला आहे.
कोकणात भाजपचा स्वबळाचा नारा?
खेड नगर परिषदेवर भाजपचा झेंडा वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच फडकेल. सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी कग्रिस (अजित पवार गट) सोबत घेणे गरजेचे आहे’, असे प्रतिपादन माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केले. भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी-दापोली विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक खेड येथील द. ग. तटकरे सभागृहात पार पडती. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश मोरे, केदार साठे, वैभव खेडेकर, ऋषिकेश मोरे, विनोद चाळके, अनिकेत कानडे, संजय बुटाला आदी मान्यवर उपस्थित होते.
Maharashtra Politics: कोकणात भाजपचा स्वबळाचा नारा? ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने महायुतीत वाढली चिंता
अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा प्रवेश
माजी आमदार दळवी म्हणाले, खेडच्या विजयासाठी दापोली व महगगडमधील कार्यकर्ते मदतीला येणार आहेत. प्रत्येक निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवायचे आहे. साध्या युतीचे धोरण फक्त मुंबई आणि ठाण्यात जाहीर झाले आहे. तरीदेखील आपण विजयासाठी प्रयत्नातील राहिले पाहिजे.
कार्यकर्त्यांतील नव्या ऊर्जेने माहोल गेला भारून
बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्ष सुरेश मोरे वानी कार्यकत्यांना आवाहन केले की, जिल्हा परिषद पंचायत समिती अणि नगर परिषद निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार विजयी करून आणण्याचे भाग्य मला मिळवून या. यासाठी सर्व कार्यकत्यांनी एकदिलाने प्रयत्न करावेत.” बैठकीचा संपूर्ण माहोल विजयाच्या निर्धाराने आणि कार्यकत्यांतील सथा ऊर्जेने भारलेला दिसून आला.






