Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात सुप्रिया सुळेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन; नतमस्तक होऊन मानले मतदारांचे आभार

पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी विजयी शक्तीप्रदर्शन करत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 06, 2024 | 04:28 PM
पुण्यात सुप्रिया सुळेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन; नतमस्तक होऊन मानले मतदारांचे आभार
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये बारामतीचा महत्त्वपूर्ण निकाल होता. बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी विजयश्री खेचून आणला. बारामतीमधील सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे आघाडी होत्या. त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला. पवार कुटुंबातील दोन्ही उमेदवार असल्यामुळे सर्वांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यामध्ये भेट दिली. यावेळी शरद पवार गटाच्या पुणे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत करत विजयी मिरवणूक काढली. पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी विजयी शक्तीप्रदर्शन करत माध्यमांशी संवाद साधला.

मतदारांना नतमस्तक होऊन आभार

सुप्रिया सुळे यांची पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये वाजत गाजत आणि गुलाल उधळत मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, या निकालामधून हे दिसत आहे की लोकांनी या दडपशाहीला नाकारले आहे. संविधान वाचवले असून संविधानाच्या चौकटीमध्येच हा देश चालेल याचा प्रत्यय लोकांनी आणून दिला आहे. भष्ट्राचाराला, महागाईला, बेरोजगाईला मतदारांनी नाकारले आहे. पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट केले. त्यामुळे मी सर्व मतदारांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना नतमस्तक होऊन आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर दाखवला. आता जबाबदारी आणखी वाढली आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

ही वैचारिक लढाई

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी लढाई ही ती कोणत्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये नसते. मी प्रचारावेळी देखील म्हणाले होते की ही वैचारिक लढाई आहे. माझी लढाई विचारांविरोधात आहे. बेरोजगारी विरोधात आहे. भष्ट्राचाराच्या विरोधात आहे. या सरकारने शेतकऱ्यांचं कबंरड मोडण्याचे जे काम केलं आहे त्याच्या विरोधामध्ये माझी ही लढाई आहे. मागील वर्ष संघर्षाचं होतं. दुष्काळ, महागाई, बेरोजगारी अशी मोठी आव्हान राज्याच्या समोर होती. राज्यात छावण्या नाहीत, चारा डेपो नाही. पाण्याचे टॅंकर वेळेवर पोहचत नाहीत. या परिस्थितीला लोक कंटाळले होते. असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

जय व पार्थ हे माझ्या मुलांसारखे

तसेच सुप्रिया सुळे यांनी अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिल्या अजित पवार गटाने वेगळा विचार केल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही लोकशाही आहे. प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आणि एखाद्याने निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे. अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या का यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, वयाने व कतृत्वाने मोठ्या असलेल्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो. त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा असतो. माझी लढाई ही व्यक्तीच्या विरोधामध्ये नाही तर विचारांच्या विरोधात आहे. तसेच सुनेत्रा पवार या माझ्या मोठ्या वहिनी आहेत. त्या वयाने, मानाने आणि पदाने माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. त्यांच्याबदद्ल माझ्या मनात नेहमी आदर व प्रेम राहिल. तसेच जय व पार्थ हे माझ्या मुलांसारखे आहेत. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Web Title: Ncp mp supriya sule gives reaction on ajit pawar and supriya sule baramati loksabha elections political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2024 | 04:28 PM

Topics:  

  • loksabha elections 2024
  • Loksabha Elections Result 2024
  • supriya sule

संबंधित बातम्या

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू
1

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.