
Kolhapur local elections: कोल्हापूर स्थानिक निवडणुका: नगरपालिका निवडणुकीत घराणेशाही व गटबाजी
या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा यावर भाष्य केलं आहे. ” राज्यात लाडकी बहीण योजना बंद होणार नाही यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये श्रेय घेण्याची चुरस दिसू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना कायम राहील, असे वक्तव्य केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनीही या स्पर्धेत उडी घेतली आहे.
भंडारा शहरातील अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलताना पटेल म्हणाले, “राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. बहिणींचा योग्य सन्मान केला जाईल. सध्या दिल्या जाणाऱ्या मानधनात आणखी वाढ करण्यावरही विचार सुरू आहे.” तिजोरीच्या चाव्यांबाबतचे हे वक्तव्य यापूर्वी अजित पवार, रूपाली चाकणकर यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आले होते. त्यात आता प्रफुल पटेल यांच्या विधानाचीही भर पडल्याने महायुतीतील नेत्यांमध्ये या योजनेच्या श्रेयासाठी जणू स्पर्धाच सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राज्यातील निधीवाटपाच्या राजकारणावरून महायुतीतील तीनही पक्षांमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे. धाराशिव येथील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने वाद पेटला होता. “माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभे राहिलात तर बातमीसारखा विकास करू शकतो. अर्थमंत्री म्हणून याकडे बारकाईने लक्ष देईन,” असे अजित पवार म्हणाले होते. त्यावरून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरीही त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येणार नाही आणि जर ती उघडली तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहितीच आहे.’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता.
तत्पूर्वी बारामतीतील एका भाषणातही त्यांनी निधीवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. “विरोधात उभा राहून निवडून आलेल्या उमेदवाराला नंतर निधी मिळाला नाही तर काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. “तुम्ही काट मारली, तर मीही काट मारणार,” असेही ते म्हणाले होते.अजित पवारांच्या या सलग वक्तव्यांवर विरोधकांनी जोरदार टीका केली असून, निधीवाटपाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.