बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंखेच कायम
सोलापूर : निवडणुकीचा खर्च सादर केला नसल्याचे कारण देत बोरामणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा साळुंखे यांच्यासह सात सदस्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केले होते. जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयाविरोधात सरपंच साळुंखे यांच्यासह अपात्र सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती मिळवली. त्यामुळे बोरामणीच्या सरपंचपदी तूर्तास तरी अरुणा साळुंखे याच कायम राहिल्या आहेत.
सरपंच साळुंखे यांच्यासह स्वप्निल पटणे, ज्योती देशमुख, वैभव हलसगे, आकाश माशाळे, स्वाती रोकडे, सुभाष भोसले अशी स्थगिती मिळालेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत. सरपंच साळुंखे यांच्यासह सर्वच सात सदस्यांनी निवडणुकीत केलेला खर्चाचा हिशेब दिला नसल्याची तक्रार माजी सरपंच पुष्पावती आवटे यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे केली होती. या तक्रारीवर सुनावणी घेऊन जिल्हाधिकार्यांनी सर्वच सातही सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयाविरोधात अपात्र ठरलेल्या सर्वच सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : राजकीय पक्षांचे चिन्हच झाले गायब; स्थानिक आघाड्यांच्या चिन्हावरच लागली मोहर
दरम्यान, निवडणूक आयोगाकडे सुनावणीदरम्यान अपात्र सदस्यांच्या वकिलांनी जिल्हाधिकार्यांच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाने स्थगिती देत अपात्र सदस्यांना दिलासा दिला. यात सरपंच साळुंखे यांच्यासह अन्य सदस्यांतर्फे अॅड. दत्तात्रय घोडके हे काम पाहत आहेत.
निवडणुकीची रणधुमाळी शिगेला
दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक ठिकाणी गोटबाजी, स्थानिक घराणेशाही आणि वैयक्तिक संबंधांवर आधारित आघाड्या उभ्या राहत असून या सर्वांमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे पक्षांची अधिकृत चिन्हे जवळजवळ गायब झाली आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमुख पक्षांचे झेंडे, गाणी, प्रचार साहित्य आणि प्रतीके गाजत असतात; मात्र, स्थानिक निवडणुकीत हीच पक्षनिष्ठा पातळ होऊन पूर्णपणे स्थानिक आघाड्यांच्या रंगाने रंगलेली दिसत आहे
हेदेखील वाचा : Nilesh Rane : बंद दाराआड सापडल्या पैशांनी खचाखच भरलेल्या बॅगा; निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरी टाकली धाड






