शहापूर: गेल्या वर्षी लोकसभा आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. त्यानंतर महाविकास आघाडीला मोठी गळती लागल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद यावर गटाला मोठा धक्का बसला आहे.
शहापूरचे माजी आमदार आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी असलेले पांडुरंग बरोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. अखेर पांडुरंग बरोरा यांनी तुतारीची साथ सोडली आहे आणि आपल्या हातात कमळ धरले आहे.
पांडुरंग बरोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत शहापूरमधील अनेक नेते आणि पदाधिकारी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पांडुरंग बरोरा हे पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते आमदार म्हणून निवडून आले होते.
कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते माजी आमदार संजय बाबा घाटगे व त्यांचे चिरंजीव अमरीश घाटगे हे पिता पुत्र आज मुंबईच्या भाजप कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करणार असून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला असल्याचे मानले जात आहे.
सन १९९८ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी दोन वेळा निवडणूक लढवली होती. मात्र कागलच्या राजकीय उलथापालथीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र तरीसुद्धा ते शिवसेनेची चिटकून राहिले होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेशी फारकत घेतली नसली तरी राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना मदत केली होती. त्यामुळे महायुतीचे उमेदवार समरजीत सिंह घाटगे यांचा पराभव झाला होता. तर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असलेले समरजितसिंह घाटगे यांना तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील होऊन त्यांना महायुतीची उमेदवारी मिळाली होती.