Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे सरकार सूडाचे राजकारण करत आहे’; शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा संताप

शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे सध्या चर्चेत आले आहे. त्यांच्यावर चालू असलेल्या खटल्यामधील सरकारी वकिलांच्या भूमिकेवरुन आव्हाड यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार पोलिसांचा वापर करत असल्याचा खळबळजनक आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 08, 2024 | 04:24 PM
jitendra awhad on state government

jitendra awhad on state government

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्याचे राजकारणे जोरदार रंगले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून खडाजंगी सुरु आहे. लवकरच विधानसभा निवडणूका देखील होणार आहेत. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र निर्माण झाले. पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे रंजक ठरणार आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे सध्या चर्चेत आले आहे. त्यांच्यावर चालू असलेल्या खटल्यामधील सरकारी वकिलांच्या भूमिकेवरुन आव्हाड यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मला माहित नव्हते की, हे सरकार मला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट देणार आहे. सूडाग्नीने पेटलेले हे सरकार पोलिसांना मोहरा बनवून सुडाचा खेळ खेळत आहे. साडेतीन वर्षांपूर्वी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी 6 तारखेला विशेष सरकारी वकिलांनी मी या गुन्ह्य़ाच्या खटल्यात सरकार / पोलिसांची बाजू मांडणार आहे, असे सत्र न्यायालयात सांगितले. खास वकील आणण्याचे ‘खास’ कारण काही समजलेले नाही. पण, यातून सरकारचा हेतू आणि सरकारची सूडाची भावना ही काही लपून रहात नाही. जेवढे खोटे करायचे तेवढे खोटे या सरकारने आणि ठाणे पोलिसांनी केले अन् अजूनही करीत आहेत आणि सांगताना मात्र , “आम्हाला काही माहितच नाही; आमचा काही संबंधच नाही,” असे म्हणत असतात. महत्वाचे म्हणजे, केस लिहिताना आपण काय लिहित आहोत हेच त्यांना माहित नसते, अशी अवस्था ठाणे पोलिसांची झाली आहे. आपली अनभिज्ञता की आपली हतबलता हीच त्यांना कळत नाही.”

मला माहित नव्हते की, हे सरकार मला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट देणार आहे. सूडाग्नीने पेटलेले हे सरकार पोलिसांना मोहरा बनवून सुडाचा खेळ खेळत आहे. साडेतीन वर्षांपूर्वी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी ६ तारखेला विशेष सरकारी वकिलांनी मी या गुन्ह्य़ाच्या खटल्यात सरकार / पोलिसांची… — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 8, 2024

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “असो, त्याच्याने फारसा फरक पडत नाही. सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. आज सासूचे तर उद्या सुनेचे दिवस येणारच आहेत. वक्त वक्त की बात है, वक्त सभी पे आता है. चलो, रूकते है, देखते है, कितना दिन चलेगा. सरकारचे अभिनंदन, मला वाढदिवसाला एवढी चांगली भेट दिल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार. मला वाढदिवसानिमित्त एवढी चांगली भेट दिली. पुरोगामी महाराष्ट्राच्या हितासाठी लढायला ईश्वर मला आणखी शक्ती देवो, एवढीच आई भवानी चरणी प्रार्थना. लडने से कौन डरता है!” अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Ncp sharad pawar group leader jitendra avhad criticized maharashtra government nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 04:24 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • jitendra avhad
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.