कर्करोगावरील लस महाराष्ट्रातही उपलब्ध होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळाले आहे. त्यानुसार, महायुतीकडून सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली केल्या जात आहेत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल, हे निश्चित झाल्याची माहिती आहे. असे जरी असले तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र वेगळीच धडपड सुरु झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस दिल्ली विधानसभा निवडणुका लढवणार आहे.
हेदेखील वाचा : मागील सरकारमध्ये जे झालं ते नव्या सरकारमध्ये होणार नाही; भाजप ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संदर्भात मोठं विधान केलं आहे. ‘आम्हाला तीन राज्यांत मान्यता मिळाली आहे. आता आम्हाला हे इथेच थांबायचे नसून पुढे जायचे आहे. राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्ष म्हणून सक्षम आणि यशस्वी बनविण्यासाठी पहिला टप्पा दिल्ली निवडणूक असणार आहे. विरेंद्रसिंह यांच्या नेतृत्वात आम्ही पक्ष वाढवू. दिल्लीत आम्ही जरूर खाते उघडणार आणि यशस्वी होणार असा मला कार्यकर्त्यांचा विश्वास पाहून वाटत असल्याचे पटेल म्हणाले.
दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात ते बोलत होते. महाराष्ट्रासह नागालँड, झारखंडमध्ये राष्ट्रवादीला मान्यता मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता निवडणूक आयोगाने काढून घेतली होती. ती पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी धडपड करत आहे.
डिसेंबरनंतर राष्ट्रीय अधिवेशन
आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता. त्यासाठी आता अधिक काम करण्याची गरज आहे, आम्ही लढू आणि यशस्वी होऊ, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. डिसेंबरनंतर आपण दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन घेऊ. पुढे कसे जायचे त्यावर त्यात मंथन करू, असे अजित पवार यांनी सांगितले.
यंग जनरेशनला आपण पुढे आणणार
यंग जनरेशनला आपण पुढे आणणार आहोत. महाराष्ट्रात महिला मतदारांनी आपल्याला चांगली साथ दिली. लोकांनी मोठा विश्वास दाखवला आहे. त्याला पूर्ण करायचे आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आम्ही जो गमावलेला तो लवकरात लवकर मिळवून दाखवू, असे पटेल म्हणाले. दरम्यान, अजित पवार गट एनडीएमध्ये आहे. त्यामुळे दिल्लीत भाजपाच्या साथीने जागा लढविणार की स्वतंत्र लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेदेखील वाचा : राज्याचा मुख्यमंत्री अखेर दिल्लीने ठरवला ! अमित शहांकडून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब, शपथविधीही ठरला?