
राष्ट्रवादीकडेच शहराच्या विकासाचे व्हिजन: आमदार शेळके
(शरद पवार गटा)च्या उमेदवारचा प्रचार शुभारंभ
विकासासाठी काम करणाऱ्याना निवडून देण्याचे आवाहन
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराचा (PCMC) सर्वांगीण विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घडवून आणला असून, आयटी पार्क, नियोजनबद्ध विकास धोरण आणि पायाभूत सुविधांमुळेच वाकड व पिंपळे निलख परिसर आज उच्चभ्रू व विकसित झाला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनाच नागरिकांनी निवडून द्यावे, असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाचे झेंडे, बॅनर आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रॅलीदरम्यान विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे प्रमुख मुद्दे मांडण्यात आले. प्रभाग क्रमांक २६ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार सारिका गणेश कस्पटे, तुषार कामठे, संकेत जगताप आणि सीमा साठे यांच्या प्रचारादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट; पुण्यातून अजित पवारांची नाराजी व्यक्त
प्रभाग क्रमांक २६ मधील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला. आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात झाली. प्रचार रॅलीची सुरुवात पिंपळे निलख येथील भैरवनाथ मंदिरापासून झाली. त्यानंतर गणेशनगर, आदर्शनगर, टकलेनगर, शिक्षक कॉलनी, व्हलकन सोसायटी, विनायकनगर, पंचशीलनगर, इंगवले चौक आणि क्रांतीनगर या परिसरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Maharashtra Politics : तेरा दिवसात समोरच्याचा तेरावा घालायचा; पुण्यात उदय सामंतांचा एल्गार
यावेळी आमदार शेळके यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला. वाकड, कस्पटे वस्ती आणि पिंपळे निलख परिसरात गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक, धार्मिक तसेच विविध क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेल्या उमेदवारांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. विकास, अनुभव आणि विश्वासाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुण्यात उदय सामंतांचा एल्गार
पुण्याचा महापौर बनवताना शिवसेनेला विचारात घ्यावच लागेल असे उद्योग मंत्री शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले. ते पुण्यातील महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभाच्या वेळी पुणे येथे बोलत होते. यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे,आमदार विजय शिवतारे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष नाना भानगिरे तसेच सर्व उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उदय सामंत म्हणाले की, पुण्याच्या राजकारणाचे इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना 120 जागांवर लढत आहे. शिवसेनेला कोणी कमी समजू नये. शिवसेना एकच्या पन्नास जागा कशा निवडून आणते ते 16 तारखेलाच कळेल.