Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूरला लवकरच नव्या कोऱ्या बसेस उपलब्ध करून देणार; परिवहनमंत्र्यांची ग्वाही

सोलापूर बस स्थानकामधील प्रसाधनगृहाची पाहणी केली. प्रवासासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह या बाबतीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 20, 2025 | 11:53 AM
सोलापूरला लवकरच नव्या कोऱ्या बसेस उपलब्ध करून देणार; परिवहनमंत्र्यांची ग्वाही

सोलापूरला लवकरच नव्या कोऱ्या बसेस उपलब्ध करून देणार; परिवहनमंत्र्यांची ग्वाही

Follow Us
Follow Us:

सोलापूर : राज्य शासन दरवर्षी पाच हजार बसेस याप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार नवीन बसेस खरेदी करणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून, सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. सध्या बार्शी आगाराला 10 नव्या बसेस मिळाल्या असून, अशाच उर्वरित 8 आगारांना देखील नवीन बसेस देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. सोलापूर बस स्थानकामधील प्रसाधनगृहाची पाहणी केली. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह या बाबतीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक कर्मचारी व प्रवासी संघटनांनी बसेस, बसस्थानक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात निवेदने सादर केली.

स्थानिक आमदार विजय देशमुख यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन बसस्थानक सुधारणेबाबत व बसेसच्या कमतरतेबाबत चर्चा केली. लवकरात लवकर सोलापूर विभागाला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी आमदार देशमुख यांना दिली. याभेटी दरम्यान एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी व अन्य अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या 5 वर्षांत 25 हजार बसेस घेणार

परिवहनमंत्री सरनाईक म्हणाले, “राज्य शासनाने दरवर्षी 5 हजार नवीन कोऱ्या एसटी बसेस महामंडळाला घेऊन देण्याचे निश्चित केले आहे. याप्रमाणे पुढील पाच वर्षात 25 हजार बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. जेणेकरून भविष्यात सर्व सामान्य प्रवासी जनतेचा प्रवास अत्यंत सुखकर आणि सुरक्षित होईल”.

कल्याणकारी मंडळाची स्थापना

महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे, या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल, असे राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वीच सांगितले होते. ते या कल्याणकारी महामंडळाच्या पहिल्या बैठकीत बोलत होते.

Web Title: New buses will be made available to solapur soon says pratap sarnaik nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Maharashtra ST Buses
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टॅक्सी, रिक्षा, बस चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक
1

Pratap Sarnaik : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टॅक्सी, रिक्षा, बस चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक

Ramai Awas Gharkul Scam: ‘रमाई आवास’ घरकुल योजनेत मोठा घोटाळा; अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप
2

Ramai Awas Gharkul Scam: ‘रमाई आवास’ घरकुल योजनेत मोठा घोटाळा; अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप

राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून…
3

राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून…

रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर ! ४ जणांचा मृत्यू, ९ जखमी, १,०३२ नागरिकांचे स्थलांतर
4

रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर ! ४ जणांचा मृत्यू, ९ जखमी, १,०३२ नागरिकांचे स्थलांतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.