Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : ‘१५० कोटींचा भाव’ कसा सुरू होतो? संजय राऊतांच्या दाव्यावर प्रताप सरनाईकांचा घणाघात

डिलिमिटेशनसाठी खासदारांना १५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पलटवार करत राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रश्न उपस्थित केले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 22, 2026 | 06:33 PM
Pratap Sarnaik reaction on sanjay raut 150 corer alligation

Pratap Sarnaik reaction on sanjay raut 150 corer alligation

Follow Us
Follow Us:
  • डिलिमिटेशन बिलावरून खासदारांना १५० कोटी रुपये दिल्याचा दावा
  • दाव्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर
  • संजय राऊतांचा टीका करण्याची सवय, चर्चेत राहण्यासाठी हे करतात
Political News : ठाणे : डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर खासदारांना १५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या दाव्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर देत राऊत यांच्या आरोपांवरच प्रश्न उपस्थित केले. “संजय राऊत बोलले की प्रत्येक गोष्टीचा दीडशे कोटी रुपयांचा भाव सुरू होतो. संजय राऊतसुद्धा विरोधी पक्षातील सदस्य आहेत. त्यांना दीडशे कोटी रुपये मिळाले की नाही, हेही पाहावे लागेल,” असे सरनाईक यांनी म्हटले.

संजय राऊत यांना सकाळी उठल्यानंतर कोणावर टीका करावी, असा प्रश्न पडलेला असतो, अशी टीका करत सरनाईक म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशातील तसेच राज्यातील इतर मोठ्या नेत्यांवर टीका करण्याची त्यांची सवय आहे. त्यामुळे ते रोज सकाळी चर्चेत राहत असतात.”

“जणू काही RBI चे गव्हर्नर असल्याप्रमाणे ते कोणाला दीडशे कोटी, कोणाला पन्नास कोटी, तर कोणाला शंभर कोटी रुपये मिळाले, असे सांगत असतात. ज्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार स्थापन झाले, त्यावेळीसुद्धा पन्नास कोटींचे भाव असल्याची ते बोंबाबोंब करत होते. तरीसुद्धा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने पुन्हा एकदा आम्हाला सत्ता दिली,” असे सरनाईक यांनी सांगितले.

डिमिलिटेशनसाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचा पलटवार

राऊत यांच्या आरोपांवर जनतेचा विश्वास नसल्याचा दावा करत ते म्हणाले, “ज्या ज्या वेळी संजय राऊत अशा पद्धतीने खासदार आणि आमदारांवर आरोप करतात, त्या त्या वेळी देशात आणि राज्यात आमची सत्ता येते. त्यामुळे त्यांच्या आरोपांना किती लोक मान्यता देतात, हे त्यांच्या वक्तव्यांवरूनच स्पष्ट होते.”

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा

दरम्यान, डिलिमिटेशनच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील खासदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवरही सरनाईक यांनी भाष्य केले. “भाजपच्या जाळ्यात कोण अडकले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. एखाद्या खासदाराला किंवा प्रादेशिक पक्षाला NDA मध्ये सहभागी व्हायचे असेल, तर त्याचे आम्ही स्वागतच करू,” असे त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून NDA मध्ये सहभागी होणे ही चांगली भूमिका असल्याचेही त्यांनी म्हटले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: संजय राऊत यांनी डिलिमिटेशनबाबत काय दावा केला?

    Ans: डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर खासदारांना १५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

  • Que: संजय राऊतांच्या १५० कोटींच्या दाव्यावर प्रताप सरनाईक काय म्हणाले?

    Ans: संजय राऊत बोलले की प्रत्येक गोष्टीचा दीडशे कोटी रुपयांचा भाव सुरू होतो, असा टोला प्रताप सरनाईक यांनी लगावला.

  • Que: सरनाईक यांनी संजय राऊतांवर आणखी काय टीका केली?

    Ans: राऊत यांना रोज सकाळी कोणावर टीका करावी, याचा प्रश्न पडतो आणि ते सातत्याने मोठ्या नेत्यांवर आरोप करत चर्चेत राहत असल्याची टीका सरनाईक यांनी केली.

Web Title: Delimitation 150 crore sanjay raut pratap sarnaik reaction political news update nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • political news
  • pratap sarnaik
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Shirsat : खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, संजय शिरसाटांचा थेट पलटवार!
1

Sanjay Shirsat : खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, संजय शिरसाटांचा थेट पलटवार!

Nashik News : ‘स्वीकृत’ची अस्वीकृती शहराध्यक्षांच्या मुळावर! नाशिकमधील अंतर्गत राजकारणाची जोरदार चर्चा
2

Nashik News : ‘स्वीकृत’ची अस्वीकृती शहराध्यक्षांच्या मुळावर! नाशिकमधील अंतर्गत राजकारणाची जोरदार चर्चा

डिमिलिटेशनसाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचा पलटवार
3

डिमिलिटेशनसाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचा पलटवार

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा
4

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.