Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: ‘नवीन नागपूर’ या भव्य प्रकल्पाला मिळणार गती; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत….

नवीन नागपूर हा देशातील एक अत्याधुनिक आणि जागतिक पातळीवरील वित्तीय व व्यवसायिक केंद्र बनण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले गेले आहे. नागपूरच्या आर्थिक नकाशावर हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 08, 2025 | 08:11 PM
Devendra Fadnavis: ‘नवीन नागपूर’ या भव्य प्रकल्पाला मिळणार गती; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत….
Follow Us
Close
Follow Us:

नवीन नागपूर प्रकल्पाला गती मिळणार
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला करार
नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार

मुंबई: महाराष्ट्रातील भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र (IBFC) म्हणून “नवीन नागपूर” या भव्य प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (NMRDA) आणि केंद्र सरकारच्या नवरत्न दर्जाच्या दोन सार्वजनिक कंपन्या – एनबीसीसी (इंडिया) लि. आणि हु डको (HUDCO) यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. या करारांमुळे नवीन नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार असून, नागपूरचा आर्थिक व व्यावसायिक चेहरा बदलण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

एनबीसीसीसोबत करार १,००० एकरांवर नवे आंतरराष्ट्रीय वित्तीयसेवा केंद्र

एनएमआरडीए आणि एनबीसीसी (इंडिया) लि. यांच्यात झालेल्या करारानुसार नवीन नागपूर प्रकल्पातील १,७१० एकरांपैकी १,००० एकरांवर विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे. उर्वरित ७१० एकर भावी विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

हा विकास प्लग-अँड-प्ले मॉडेलवर आधारित

यात समाविष्ट होणाऱ्या सुविधा – समाकलित भूमिगत उपयुक्तता टनेल्स, डिस्ट्रिक्ट कूलिंग सिस्टम, स्वयंचलित कचरा संकलन व वर्गीकरण प्रकल्प, स्टार्ट-अप्स, MSME, आयटी कंपन्या, व्यावसायिक केंद्रे, तसेच निवासी व मिश्र वापर प्रकल्प एनबीसीसीला या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार संस्था म्हणून नेमण्यात आले आहे. पुढील १५ वर्षांत तीन टप्प्यांत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठी एक सक्षम समिती स्थापन करण्यात येईल, ज्याचे अध्यक्ष एनएमआरडीएचे आयुक्त असतील.

🔸CM Devendra Fadnavis presided over the MoU signing and exchange between: 🤝Nagpur Metropolitan Region Development Authority (NMRDA) and NBCC India Limited.
This MoU will facilitate the development of the Naveen Nagpur International Business and Financial Centre (IBFC) across… pic.twitter.com/2nJcIGQTI3
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 8, 2025

हडकोसोबत करार ११,३०० कोटींचा वित्तपुरवठा

दुसरा महत्त्वाचा करार एनएमआरडीए आणि हडको (Housing and Urban Development Corporation Ltd.) यांच्यात करण्यात आला. या कराराअंतर्गत हडको ₹११,३०० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये ६,५०० कोटी रुपये नवीन नागपूरसाठी भूसंपादन, व्यावसायिक विकास आणि पायाभूत सुविधा, ४,८०० कोटी रुपये नागपूर बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादन या निधीमुळे “नवीन नागपूर” प्रकल्पाची संकल्पना आणि “नागपूर बाह्य वळण रस्ता” यांसारखे पायाभूत प्रकल्प वेगाने आकार घेतील. या भागीदारीत कार्यशाळा, प्रशिक्षण व क्षमतावृद्धी कार्यक्रमांचाही समावेश असेल.

या वेळी एनबीसीसी (इंडिया) लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक के. पी. महादेवस्वामी, हडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय कुलश्रेष्ठ, तसेच एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीणा (आयएएस) आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पांना महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष अंमलबजावणीस गती मिळणार आहे. या दोन्ही सामंजस्य करारांमुळे “नवीन नागपूर” हा देशातील एक अत्याधुनिक आणि जागतिक पातळीवरील वित्तीय व व्यवसायिक केंद्र बनण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले गेले आहे. नागपूरच्या आर्थिक नकाशावर हे प्रकल्प “गेम चेंजर” ठरणार आहे.

Web Title: New nagpur project will gain momentum agreement signed the presence of cm fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 08:11 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Development Plan
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
1

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 
2

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी
3

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी

डिजिटल अरेस्टच्या नावावर दोघांना गंडा; तब्बल दोन कोटींची केली फसवणूक
4

डिजिटल अरेस्टच्या नावावर दोघांना गंडा; तब्बल दोन कोटींची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.