Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवा प्लॅन; पुणे पालिकेचा सर्वंकष मोबिलिटी प्लॅन

पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी पुणे महापालिकेने विमानतळ क्षेत्र एकात्मता आराखड्यासह नगर रस्त्याचा सर्वंकष मोबिलिटी प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

  • By प्रीति माने
Updated On: Apr 23, 2025 | 06:13 PM
1,667 landlords in the city have outstanding debts of Rs 7,637 crores

1,667 landlords in the city have outstanding debts of Rs 7,637 crores

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शहराच्या ईशान्य भागातील वाढती वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने विमानतळ क्षेत्र एकात्मता आराखड्यासह नगर रस्त्याचा सर्वंकष मोबिलिटी प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेगाने विकसित होत असलेल्या भागाला भेडसावणाऱ्या तीव्र रहदारीच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी महापालिका सल्लागार नेमणार आहे.

खासगी वाहनांची झपाट्याने होणारी वाढ, शहरी भागाचा विस्तार आणि अपुऱ्या वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमुळे पुण्यातील वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. शहराच्या ईशान्य भागात, ज्यात नगर रोड, विश्रांतवाडी, विमान नगर, पुणे विमानतळ परिसर आणि वाघोलीचा समावेश आहे. या सर्व भागात अलीकडील काही वर्षांत निवासी, व्यावसायिक आणि संस्थात्मक आस्थापनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विमानतळ परिसर शहराचे महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून काम करतो, तर नगर रोड दक्षिणेकडील महत्त्वाच्या आयटी झोन आणि ईशान्येकडील विस्तारित उपनगरांना जोडतो. मात्र, समन्वयाचा अभाव वाहतुकीचे नियोजन नसल्यामुळे विशेषत: गर्दीच्या वेळी ट्रॅफिक जॅम असते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वाहतुकीचे नियमन करण्यासाठी महापालिकेने सदलबाबा चौक आणि शास्त्रीनगर चौक, असे दोन उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर प्रस्तावित केले आहेत. त्याशिवाय वनाज-रामवाडी मेट्रो मार्ग वाघोलीपर्यंत वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडने (एमएसआयडीसीएल) विमाननगर ते शिरूर एलिव्हेटेड उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. नगर रोड हा पुण्यातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असला, तरी तो सर्वाधिक वर्दळीचा रस्ता बनला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेने उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, मेट्रो प्रकल्पाचा विस्तार असे अनेक उपाय सुचवले आहेत. राज्य सरकारने रिंगरोड आणि पुणे ते शिरूर, असा ५३ किलोमीटरचा एलिव्हेटेड रोड तयार केला आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेऊन महापालिकेने सर्वसमावेशक मोबिलिटी प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन निविदा आल्या 

नगर रस्त्याचा मोबिलिटी प्लॅन तयार करणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेने निविदा मागविली होती. त्यामध्ये दोन जणांनी भाग घेतला आहे. सर्व प्रक्रिया करून सल्लागार नेमला जाणार आहे, असे पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुण्यात अपघाताची मोठी घटना घडली आहे.  डेक्कन परिसरातील घोले रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कारचालकावर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेणुकदास नारायण जोशी (वय ६५) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालकावर गु्न्हा नोंद केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी योगेश जावळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुचाकीस्वार रेणुकदास जोशी १५ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाशीची राणी चौकातून घोले रस्त्याकडे निघाले होते. झाशीची राणी चौकातील कोपऱ्यावर कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात जोशी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.

Web Title: New plan to solve traffic congestion in pune pmc comprehensive mobility plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Traffic
  • Traffic News

संबंधित बातम्या

मुळा मुठेच्या किनारी ज्ञानयज्ञ, पुण्यात ग्रंथांची पेठ उभी; पुणे पुस्तक महोत्सवात विश्वास पाटील यांचे विचार
1

मुळा मुठेच्या किनारी ज्ञानयज्ञ, पुण्यात ग्रंथांची पेठ उभी; पुणे पुस्तक महोत्सवात विश्वास पाटील यांचे विचार

Pune Election : उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या नेत्यांची होणार दमछाक; 165 जागांसाठी 2500 जणांच्या मुलाखती
2

Pune Election : उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या नेत्यांची होणार दमछाक; 165 जागांसाठी 2500 जणांच्या मुलाखती

Maharashtra Politics: भाजपच्या ‘फास्ट ट्रॅक’ मुलाखतींमुळे इच्छुकांमध्ये धाकधूक; ४१ प्रभाग अन् २५००…
3

Maharashtra Politics: भाजपच्या ‘फास्ट ट्रॅक’ मुलाखतींमुळे इच्छुकांमध्ये धाकधूक; ४१ प्रभाग अन् २५००…

Pune News: शहराच्या जीवनवाहिनीला ‘ब्रेकडाऊन’ चा आजार; दररोज ६१ बसेस…; प्रवाशांचे हाल
4

Pune News: शहराच्या जीवनवाहिनीला ‘ब्रेकडाऊन’ चा आजार; दररोज ६१ बसेस…; प्रवाशांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.