Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा

महापालिकेने वीजबिल भरलेले असतानाही महावितरणच्या एका निर्णयाचा फटका पुण्यातील वाहतूक सिग्नल यंत्रणेला बसला आहे. स्ट्रीट लाईटच्या वीजजोडणीवर अवलंबून असलेले शहरातील सुमारे ६० सिग्नल बंद पडले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 10, 2026 | 01:57 PM
पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’
  • तब्बल ६० सिग्नल बंद पडले
  • महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा
पुणे : महापालिकेने वीजबिल भरलेले असतानाही महावितरणच्या एका निर्णयाचा फटका पुण्यातील वाहतूक सिग्नल यंत्रणेला बसला आहे. स्ट्रीट लाईटच्या वीजजोडणीवर अवलंबून असलेले शहरातील सुमारे ६० सिग्नल बंद पडले आहेत. स्ट्रीट लाईटसाठी बसविण्यात आलेले प्रीपेड मीटर सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेकडून वीजबिलांचा भरणा करण्यात आला असून, आगाऊ बिलही भरले जाते. असे असतानाही स्ट्रीट लाईटच्या जोडणीवरून वीजपुरवठा होणारे सिग्नल बंद असल्याने प्रशासनासमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

सिग्नल बंद असल्यामुळे संबंधित चौकांतील वाहतूक नियंत्रणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या समस्येबाबत महावितरणशी संपर्क साधून सिग्नलचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी महापालिका करणार आहे. यासाठी महावितरणला ई-मेल पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.

हडपसरपासून येरवड्यापर्यंत परिणाम

हडपसर, कात्रज आणि येरवड्यासह शहराच्या विविध भागांतील चौकांमध्ये सिग्नल बंद पडल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. मांजरी फाटा, लक्ष्मी कॉलनी, रवी दर्शन, गाडीतळ, हडपसर वेश, मगरपट्टा जंक्शन, वैदुवाडी, रामटेकडी, काळूबाई चौक, सोपान बाग, भैरोबा नाला, लुल्लानगर, महेश सोसायटी, अण्णाभाऊ साठे चौक, मार्केट यार्ड, पुष्पमंगल चौक, पद्मावती चौक आणि कात्रज जकात नाका येथील सिग्नल बंद होते. तसेच अलका चौक, एस. पी. कॉलेज चौक, विनोबा भावे चौक, महात्मा गांधी चौक, आरटीओ चौक, बिशप चौक, येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खराडी जकात नाका, साईनाथनगर, गोल्फ चौक आणि विश्रांतवाडी चौकासह अन्य ठिकाणच्या सिग्नलचाही यामध्ये समावेश आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरण आणि पुणे महापालिकेने अलीकडेच बसविलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे ४६ वाहतूक सिग्नलचा वीजपुरवठा आपोआप बंद झाला. त्यापैकी सहा सिग्नल सुरू करण्यात आले असून, उर्वरित ४० सिग्नल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिका आणि महावितरणचे मुख्य अभियंते ही समस्या दूर करण्यासाठी काम करीत आहेत. सर्व सिग्नलचा वीजपुरवठा लवकरच पूर्ववत होईल, असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : गाडीवरील स्टिकरवरून माग काढला; दिव्यांग मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

६०० पोलिस नियुक्त

सिग्नल व्यवस्था अचानक कोलमोडल्यामुळे पोलिसांची देखील चांगलीच धावपळ उडाली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी वाहतूक पोलिसांसह अतिरीक्त ६०० पोलिस तैनात केले होते. सिग्नल बंद असलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम केले. त्यामुळे पोलिसांवर अचानक झालेल्या सिग्नलचा गोंधळाचा ताण पडला.

Web Title: A decision by mahavitaran has caused many traffic signals in pune to stop working nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • mahavitaran
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
1

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस
2

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
3

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
4

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.