Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क

Golf: डीपी वर्ल्ड इंडिया गोल्फ चॅम्पियनशीप स्पर्धेत जगभरातील अनेक स्टार गोल्फपटूंनी आपला सहभाग निश्चित केला असून डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो या संकेत स्थळावर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची तिकीट विक्री सुरु झाली आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 10, 2026 | 09:45 PM
DP World India Championship

DP World India Championship

Follow Us
Follow Us:
  • डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशीप दिल्ली गोल्फ क्लब येथे होणार
  •  १५ ऑक्टोबर पासून रंगणार सामने
  • जगातील अव्वल गोल्फ पटूंचा सहभाग
पुणे: दिल्ली गोल्फ क्लब यांनी सुमारे सहा दशकापूर्वी, १९६५ मध्ये पहिल्या इंडियन ओपन गोल्फ स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केल्यापासून हा क्लब भारतीय गोल्फ क्लबचे माहेर घर म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळे येत्या १५ ऑक्टोबर पासून रंगणाऱ्या ४० लाख डॉलर पारितोषिक रकमेच्या डीपी वर्ल्ड इंडिया गोल्फ चॅम्पियनशीप साठी यजमान पदाचा मान दिल्ली गोल्फ क्लबला देण्यात आला.

या ऐतिहासिक क्लब मध्ये १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान पार पडणाऱ्या  डीपी वर्ल्ड इंडिया गोल्फ चॅम्पियनशीप स्पर्धेत जगभरातील अनेक स्टार गोल्फपटूंनी आपला सहभाग निश्चित केला असून डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो या संकेत स्थळावर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची तिकीट विक्री सुरु झाली आहे.

Chess Tournament : निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत तामोजी चक्रवर्ती, अमृता लाड प्रथम

जगातील सर्वोत्तम खेळाडू रोरी मॅकएलरॉय आणि गतविजेत्या टॉमी फ्लीटवूडसह जगातील विविध स्पर्धांमधील विजेते खेळाडू विक्रमी पारितोषिक रकमेसाठी आपले कौशल्य पणाला लावणार असून त्यामुळे स्पर्धेच्या आकर्षणात भर पडली आहे. आतापर्यंत भारतात आणि आशियात झालेल्या गोल्फ स्पर्धांमध्ये एकत्र आलेला सर्वोत्कृष्ट तारांकित खेळाडूंचा संच या स्पर्धेत पाहावयास मिळणार असून, २०२५च्या स्पर्धेत खेळलेल्या अनेक  खेळाडूंसोबत जगभरातील विविध मेजर स्पर्धांचे विजेते एरॉन राय, रयान फॉक्स, स्पॅट्रिक रीड आणि जस्टिन रोझ यांच्या सहभागामुळे या स्पर्धेला आगळी प्रतिष्ठा लाभली आहे.

या स्पर्धेच्या मानांकन यादीत रोरी मॅकएलरॉय व स्पॅट्रिक रीड या माजी मास्टर्स विजेत्यांसह विद्यमान ओपन विजेता रयान फॉक्स, तसेच पीजीए चॅम्पियनशिप विजेता एरॉन राय आणि माजी यूएस ओपन विजेता व ऑलिम्पिक विजेता जस्टिन रोझ यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे.

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद

गोल्फच्या इतिहासांतील सर्व मेजर स्पर्धा जिंकून करिअर स्लॅम पटकावणारा जगभरातील इतिहासातील केवळ सहावा खेळाडू रोरी मॅकएलरॉय  याला अग्रमानांकन देण्यात आले असून, त्या पाठोपाठ गतविजेता फ्लीटवूड, माजी ओपन विजेता स्टेन लॉरी, माजी फेडेक्स कप विजेता व्हिक्टर हॉगलँड तसेच, युरोपियन रायडर कप कर्णधार आणि माजी अव्वल मानांकित ल्युक डोनाल्ड यांनी मानांकन यादीत स्थान मिळवले आहे.

Web Title: Dp world india golf championship 15 to 18 october 2026 at delhi tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Delhi news
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद
1

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद

सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार
2

सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा
3

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.