Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही”; प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश

या कारवाईनंतर प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या सदस्यांनी गुरूवारी सकाळी मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांवरच्या कारवाईबाबत चर्चा झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 30, 2025 | 03:21 PM
मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश

मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश

Follow Us
Follow Us:

बदलापूर : शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईत अनावधानाने वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई झाली. मात्र यापुढे त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. तसेच त्यांचे जप्त साहित्यही त्यांना परत केले जाईल, असे आश्वासन कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिले आहे. प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या सदस्यांनी गुरूवारी पालिका मुख्यालयात मुख्याधिकारी गायकवाड यांची भेट घेतली. वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्यासाठीचा आदेश काढण्याची मागणीही यावेळी सदस्यांनी केली. त्यावरही लवकरच निर्णय घेऊ असेही गायकवाड म्हणाले.

“अजितदादांची भूमिका हीच अधिकृत…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुडेंच्या राजीनाम्यावर मांडली भूमिका

कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी या आठवड्यात शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. सोमवारी बदलापूर पूर्वेतील काही भागात कारवाई केल्यानंतर बुधवारी बदलापूर पश्चिमेतील स्थानक परिसर, बाजारपेठ भागात कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वृत्तपत्र विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुंबई शहरात महापालिकेने वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई महापालिका क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण दिले होते. पुढे ठाणे महापालिकेनेही अशाच प्रकारे वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्यात आले होते. मात्र बदलापुरात कारवाई का ? असा प्रश्न वृत्तपत्र विक्रेत्यांनी उपस्थित केला.

डोंबिवलीतील वाहतूक कोंडी कायमची सुटणार? ‘या’ मार्गावरील उड्डाणपुलाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा

या कारवाईनंतर प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या सदस्यांनी गुरूवारी सकाळी मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांवरच्या कारवाईबाबत चर्चा झाली. यावेळी बोलताना यापुढे अशी कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या सदस्यांना दिली. तसेच “बुधवारच्या कारवाईत ज्यांचे साहित्य जप्त झाले आहे त्यांना ते परत करू आणि यापुढे काळजी घेऊ”, असेही आश्वासन मुख्याधिकार्यांनी दिले. बदलापूर शहरात वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देणारे आदेश द्यावेत अशीही मागणी प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या वतीने करण्यात आली. तर याबाबत तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेऊ असेही आश्वासन गायकवाड यांनी दिले. त्यामुळे शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी प्रेस क्लब ऑफ बदलापुरचे अध्यक्ष विजय पंचमुख, सचिव संजय साळूंके, सागर नरेकर, अनिल मिश्रा, दर्शन सोनावणे, तन्मय सोहोनी, तन्मय तांबे आणि इतर सहकारी उपस्थित होते.

Web Title: Newspaper vendors will not be prosecuted success to press club of badlapurs demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • Badlapur News
  • thane

संबंधित बातम्या

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
1

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Pratap Sarnaik : आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी
2

Pratap Sarnaik : आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी
3

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी

Bhiwandi News: भावाला पाणी आणायला पाठवून ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, भिवंडीतून संतापजनक प्रकार उघड
4

Bhiwandi News: भावाला पाणी आणायला पाठवून ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, भिवंडीतून संतापजनक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.