डोंबिवलीतील वाहतूक कोंडी कायमची सुटणार? 'या' मार्गावरील उड्डाणपुलाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा
डोंबिवली: वाढत चाललेल्या ट्राफिकमुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला समोरं जावं लागत होतं. याचपार्श्वभूमीवर आता आमदार व भाजप प्रदेश कार्यध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वाहतूक कोंडींच्या समस्येवर तोडगा काढला आहे.आमदार व भाजप प्रदेश कार्यध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महानगर पालिका प्रशासनास डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या स. वा. जोशी शाळेसमोरच्या उड्डाणपुलाच्या म्हासोबा चौकापर्यंतच्या विस्ताराचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पुल बांधणीसाठी लागणाऱ्या जागेसाठी ६० रहिवाशांना बेघर व्हावे लागणार होते. ही बाब लक्षात घेत आमदार रविंद्र चव्हाण यांनी त्या पुलाने बाधित ६० रहिवाशांना पर्यायी घरांची वाटप पत्रे वाटप पत्रे (अलॉटमेंट लेटर) वितरित केलरी आहे.
पंढरपुरात मंदिर समितीचा मोठा निर्णय; नवदाम्पत्यांना विठुरायाचे थेट दर्शन मिळणार
याबाबतचा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाने गुरुवारी दुपारी तीन वाजता अत्रे रंगमंदिर येथे आयोजित केलेला आहे.त्या पुलामुळे विस्थापीत होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सदर उड्डाणपुलाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता काम वेगाने पुढे जाईल असे चव्हाण म्हणाले.
भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत डोंबिवली पश्चिम भागातील पाणी पुरवठा बाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी चव्हाण यांनी डोंबिवली पश्चिम वृंदावन येथील संपपंपच्या जागी असलेले अतिक्रमण हटवून संपपंपची उभारण्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. त्याची अंमलबजावणी त्वरित झाली असून आता तो अडसर दूर झाला आहे. चव्हाण यांच्या सूचनानंतर महानगरपालिका प्रशासनाने संप पंपाच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवलेले असून पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाचे काम वेगाने सुरू करण्यात आलेले आहे.
तासगाव पोलिसांनी सराईत चोरट्याला पकडले; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त
वृंदावन येथील जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा व जलवाहिन्यांच्या आराखड्यासाठी आयआयटी मुंबईचे तज्ञ डॉक्टर अनुज कुमार घोरपडे यांनी विकसित केलेल्या शाफ्ट आणि मॅनिफोल्ड टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात येणार असून या टेक्नॉलॉजी मुळे उंच सखल भागात एकसमान दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे राजूनगर व कुंभारखाण पाडा परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असल्याचा विश्वास आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.