परीक्षेत कॉपी कराल तर पहिला दणका शिक्षकांना; CM देवेंद्र फडणवीसांचे आदेश
नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर त्यांनी अनेक भेटीगाठी घेतल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत देखील भाष्य केले आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये शिवसेना व भाजपच्या सुरु असलेल्या युतीच्या चर्चेवर देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी यावरुन देखील स्पष्ट भूमिका मांडली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये भेट झाली. भाजपाचे विलेपार्ले येथील आमदार पराग अळवणी यांच्या कन्येच्या लग्नसोहळ्यात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यामुळे सर्वांनी भुवया उंचावल्या आहेत. यामुळे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील भाजप व शिवसेना युतीबाबत सूचक वक्तव्य केले होते. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाणा आले आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “लग्नात भेटणे हे स्वाभाविक आहे. मी तिथे असतो तर माझीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली असती. त्यात फार काही विशेष नाही. पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्याने पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा किमान तुमच्या सारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात येऊ नये, ही आमची अपेक्षा आहे,” असा जोरदार टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे हे देखील दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत दिल्ली दरबारी निर्णय घेतली जाण्याची शक्यता होती. त्याचबरोबर पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अजित पवार हे बीड दौऱ्यावर गेले आहे. यामुळे आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “धनंजय मुंडे त्यांच्या कामाच्या निमित्ताने आले होते. मी माझ्या कामाच्या निमित्ताने आलो आहे. त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी कॅबिनेटमध्ये आमची भेट झाली होती. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्याची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात. मी त्यांना कधीही भेटू शकतो. कुठल्याही कामासाठी भेटू शकतो. त्यांच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमधून व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत देखील मत व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नवी दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, जगभरातील मराठी माणसाकरिता साहित्य संमेलन ही अभिमानाची गोष्ट आहे. देशाच्या राजधानीमध्ये अतिशय भव्य स्वरुपामध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनासाठी हे काही सहकार्य लागेल त्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.