Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News: राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ

मुंबई मध्यवर्ती कारागृहाचा पुर्नविकास करण्याच्या दृष्टीने त्याचे नकाशे व आराखडे तयार करण्याची कार्यवाही पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या. मुंबई यांच्याकडून प्रगतीत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 17, 2026 | 02:35 AM
Maharashtra News: राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ
Follow Us
Follow Us:

बांधकामासाठी नवीन जागेची मागणी
अधिकृत बंदी क्षमतेत १,०३५ एवढी वाढ होणार
उर्वरित बांधकामे आहेत प्रगतीपथावर

मुंबई: राज्यात पालघर, अहिल्यानगर, बारामती, येरवडा क्र.०२ व क्र. ०३ जि. पुणे, गोंदिया, हिंगोली, भुसावळ (जि. जळगाव) व अंबाजोगाई (जि. बीड) अशा एकूण नऊ ठिकाणी नवीन मध्यवर्ती व जिल्हा कारागृहे बांधणे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण १२ हजार २५८ ने बंदी क्षमतेत वाढ होणार आहे. त्यापैकी पालघर, नारायणडोह (अहिल्यानगर) व बारामती (पुणे) येथे अनुक्रमे १८, ३५ व ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित बांधकामे प्रगतीपथावर आहेत.

येरवडा मध्यवर्ती, येरवडा खुले, येरवडा महिला खुले कारागृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह, बुलढाणा जिल्हा कारागृह, यवतमाळ व वर्धा जिल्हा कारागृह येथे सर्व मिळून ३५ बॅरेकची बांधकामे प्रगतीपथावर असून ती पूर्ण होताच एकूण अधिकृत बंदी क्षमतेत १,०३५ एवढी वाढ होणार आहे. तसेच २०२५-२६ या आर्थिक वर्षात संभाजीनगर मध्यवर्ती व संभाजीनगर खुले कारागृह, अकोला महिला खुले कारागृह, कोल्हापूर खुले कारागृह, विसापूर (जि. अहिल्यानगर) खुले कारागृह, लातूर जिल्हा कारागृह, जालना जिल्हा कारागृह व धुळे खुले कारागृह या अस्तित्वातील कारागृहांत अतिरिक्त बॅरेक्सच्या बांधकामास प्रशसकीय मान्यता देण्यात आली आहे. सदरची बांधकामे पूर्ण होताच एकूण ११३८ एवढ्या बंदी क्षमतेत वाढ होणार आहे.

Jalgaon News : जिल्हा कारागृहांना ‘गँगवार’चा धोका? लहान जेलमध्ये कुख्यात गुंडांचा भरणा

नवीन कारागृह बांधकामांची एकूण बंदी क्षमता १२,२५८ व अतिरिक्त बॅरेक्सची बांधकामे ४,०२९ असे एकूण १६,२८७ नव्याने बंदी क्षमतेत वाढ होणार आहे. राज्यातील कारागृहातील बंद्याची वाढती संख्या लक्षात घेता एकूण १४ ठिकाणी नवीन जागेची मागणी करण्यात आली आहे. नवीन जागा कारागृह विभागास प्राप्त होताच, त्या ठिकाणी नवीन मध्यवर्ती/जिल्हा कारागृहे प्रस्तावित करता येतील. त्यामुळे देखील राज्यातील कारागृहांची अधिकृत बंदी क्षमतेत वाढ होणार आहे.

मुंबई मध्यवर्ती कारागृहाचा पुर्नविकास करण्याच्या दृष्टीने त्याचे नकाशे व आराखडे तयार करण्याची कार्यवाही पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या. मुंबई यांच्याकडून प्रगतीत आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्र. १२ सी हा संपूर्ण व सर्कल क्र. १२बी या इमारतीचा तळमजला हे सद्यस्थितीत विधि विभागाच्या ताब्यात आहेत. ते दोन्ही भाग कारागृह विभागास हस्तांतर करण्याची कार्यवाही चालू आहे.

गुन्हेगारांचा ‘गेम’ ओव्हर! ‘या’ राज्यात उभारली जाणार हाय-सिक्युरिटी जेल; ‘कालापाणी’सारखी मिळणार शिक्षा

तरी राज्यातील कारागृहात बंद्यांची अतिगर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने नविन कारागृहांचे बांधकाम, अस्तित्वातील कारागृहांत अतिरिक्त बॅरेक्सचे बांधकाम तसेन नवीन कारागृहांच्या बांधकामासाठी नवीन जागेची मागणी अशा उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती गृह विभागाने दिली आहे.

Web Title: Nine new prisons proposed in the state inmate capacity to increase in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Jail
  • maharashtra news
  • Maharashtra Police

संबंधित बातम्या

Rajapur News: राजापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अचानक आग!
1

Rajapur News: राजापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अचानक आग!

Jalgaon News: पायांना साखळी, कुलूप अन् तापी नदीत मृतदेह! जोडप्याच्या हत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?
2

Jalgaon News: पायांना साखळी, कुलूप अन् तापी नदीत मृतदेह! जोडप्याच्या हत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत मानधनासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा
3

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत मानधनासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
4

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.