Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराडमध्ये शंभूतीर्थवर उभारला 90 फुटी भगवा ध्वज; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर…

शंभूतीर्थवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 12 कोटी निधीतून भव्य छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 20, 2026 | 01:35 PM
कराडमध्ये शंभूतीर्थवर उभारला नव्वद फुटी भगवा ध्वज

कराडमध्ये शंभूतीर्थवर उभारला नव्वद फुटी भगवा ध्वज

Follow Us
Follow Us:

कराड : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येथील शंभूतीर्थवर छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर नव्वद फुटी भगवा ध्वज उभारण्यात आला. या ध्वजाचे उद्घाटन धारेश्वरचे मठाधिपती नीळकंठ शिवाचार्य, महालिंगेश्वर मठाधिपती विजयलिंग महाराज, बाळासाहेब महाराज, आमदार डॉ. अतुल भोसले, हिंदू एकता आंदोलनचे विक्रम पावसकर यांच्या हस्ते झाले.

शंभूतीर्थवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 12 कोटी निधीतून भव्य छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्मारकाचाच भाग असणारा नव्वद फुटी भगवा ध्वज स्मारकासमोर उभारण्यात आला आहे. शहरात प्रथमच इतक्या मोठ्या उंचीचा ध्वज उभारण्यात आला आहे. या ध्वजाने कराडच्या वैभवात भर पडली आहे.

“इलेक्ट्रिक बस बैठक फुसका बार, मंत्र्यांच्या निर्देशाचे अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही”, एसटी कर्मचारी काँग्रेसची टीका

यावेळी बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराडकर नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून असणारी छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची मागणी महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सचिव रणजितनाना पाटील यांनी मोठे योगदान दिले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येथे भगवा ध्वज उभारण्यात आला आहे. भविष्यात स्मारक समितीला पूर्ण सहकार्य करणार आहे.

रणजित पाटील म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. संभाजी महाराजाचा भव्य पुतळा आणण्यात आला असून, येत्या दोन महिन्यात स्मारकात हा पुतळा बसविण्यात येणार आहे. उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, पालिकेतील गटनेते विजय वाटेगावकर, सौरभ पाटील, स्मिता हुलवान, नगरसेवक आशुतोष डुबल, सुमित जाधव, शिवाजी पवार, वर्षा वास्के, किशोरी शिंदे, वैष्णवी वायदंडे, महादेव पवार, संजय शिंदे, काकासाहेब पवार, सुहास जगताप, संजय थोरात, सागर आमले, प्रतापराव इंगवले आदींसह शिवशंभूप्रेमी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेदेखील वाचा : Mumbai News : परदेशी पर्यटकांच्या व्हिडीओचा इम्पॅक्ट! वांद्रे रेल्वे स्थानकावरील अतिक्रमणांवर रेल्वेचा हातोडा

Web Title: Ninety foot saffron flag has been hoisted at shambhutirtha in karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Karad news

संबंधित बातम्या

Gharkul Yojana benefits: ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल असूनही लाभ मिळेना’; घरकुलाच्या मागणीसाठी अरविंद हजारे ॲक्शन मोडमध्ये!
1

Gharkul Yojana benefits: ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल असूनही लाभ मिळेना’; घरकुलाच्या मागणीसाठी अरविंद हजारे ॲक्शन मोडमध्ये!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.